Published On : Wed, Jul 29th, 2020

लॉक डाऊन लागू करण्या संदर्भातील अफवांवर विश्वास ठेऊ नका- डॉ संजीव कुमार

लॉक डाऊन लागू करण्या पूर्वी चार दिवस आधी माहिती देण्यात येईल

नागपूर दिनाक २९ लॉक डाऊन लागू होणार असल्याबद्दल मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्यात येत आहेत, जनतेनी अफवार विश्वास ठेऊ नये, लॉक डाऊन संदर्भात परिस्थती निर्माण झाल्यास जनेला चार दिवस आधी सूचित करण्यात येईल असे विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी सुरू असलेल्या अफवा संदर्भात स्पष्ट केले आहे.

पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी लॉक डाऊन संदर्भात विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी याची समिती निर्णय घेऊन चार दिवस आधी जनतेला माहिती देऊनच निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे,त्यामुळे लॉक डाऊन चां निर्णय झाला नाही,त्यामुळे लॉक डाऊन लागू होण्याचा प्रश्नच नाही, समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहेत, जनतेने अशा अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन डॉ संजीव कुमार यांनी केले आहे.