Published On : Wed, Jul 29th, 2020

आरोग्य कर्मचाऱ्यासह 58 रुग्ण कोरोना पॉजीटिव्ह आढळले

कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कामठी तालुका प्रशासन तत्परतेची भूमिका साकारत असली तरी तालुक्यातील कोरोना बधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढीवरच आहे आज तर चक्क पन्नाशी च्या वर कोरोना चा आकडा गाठलेला असून आज आलेल्या कोरोना पॉजिटीव्ह अहवालात कामठी तालुक्यातील शास्कोय उपजिल्हा रुग्णालय कामठी येथील एक कर्मचारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी च्या एका कर्मचाऱ्यासह 58 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून आजपावेतो एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या ही 476 झाली आहे तर आजपावेतो एकूण 12 रुग्ण हे कोरोनाबधित होऊन मृत्यूस बळी ठरले तर 193 रुग्ण हे कोरोनावर मात करून उपचार घेऊन घरी परतले आहेत यानुसार आजपावेती 271 रुग्ण हे उपचार घेत आहेत.

आज आढळलेल्या 58 कोरोनाबधित रुग्णामध्ये शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी चा एक कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय एक कर्मचारी , इमलिबाग 01, इस्माईलपुरा 01,उंटखाना 03, कांटी ओली 01, कुंभारे कॉलोनी 02, कोळसाटाल 01,खैरी 01,गोराबाजार 01, छावणी परिषद कामठी 03, जयभीम चौक कामठी 01, ताज चौक नया बाजार 01, द्रजीपुरा 01, अय्या अखाडा चौक02, दाल ओली न 02, नया गोदाम कामठी 01, नया नगर कामठी 01,नया बाजार कामठी 04,न्यू खलाशी लाईन कामठी 02, न्यू येरखेडा 01, पुराणा भोईपुरा 01, फुटाना ओली कामठी 01, बी बी कॉलोनी 02,बुनकर कॉलोनी 01,भोई लाईन 01, भाजी मंडी 01मोंढा कामठी 01,म्हसळा कामठी 01,येरखेडा 02, रणाळा 05,रमानगर 01,वारीसपुरा 01,बी बी कॉलोनी 02,सुपारे नगर 01,गुंमथळा 01,हमालपुरा 01 व इतर ठिकाणी चे 3 रुग्ण कोरिणाबधित आढळले आहेत या सर्व रुग्णांना नागपूर च्या मेयो मेडिकल इस्पितळातील विलीगिकरंन कक्षात हलविन्यात आले आहे.