Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Nov 21st, 2018

  राज्यातील टँकरची परिस्थिती ही जलयुक्त शिवार योजनेचे अपयश दर्शवणारीः सचिन सावंत

  मुंबई: जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळ तीव्र झाल्या असून राज्यात विविध भागात रोज वाढलेली असलेली टँकरची संख्या जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश दर्शवणारे आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

  या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, सद्य स्थितीत नोव्हेंबर महिन्यात राज्यात टँकरच्या संख्येत झालेली वाढ चक्रावून टाकणारी आहे. या वर्षी राज्यात जवळपास ७४.३ टक्के पाऊ पडला ही वस्तुस्थिती आहे. पाणीपुवठा विभागाच्या आकडेवारीनुसार १७ नोव्हेंबर २०१८ पर्यंत राज्यात एकूण ७१५ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

  २०१४ साली राज्यात ७०.२ टक्के म्हणजे यावर्षीपेक्षा कमी पाऊस पडला होता. त्यावेळी १७ नोव्हेंबर २०१४ च्या आकडेवारीनुसार राज्यात केवळ ७१ टँकर सुरु होते. २०१५ साली राज्यात त्याहीपेक्षा कमी म्हणजेच ५९.४ टक्के पाऊस पडला होता. १६ नोव्हेंबर २०१५ च्या आकडेवारीनुसार त्यावेळेस ६९३ टँकर राज्यात सुरु होते. यातूनच जलयुक्त शिवार योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होत असून या योजनेवर खर्च झालेले ७ हजार ७८९ कोटी रूपये हे जलयुक्त शिवारच्या खड्ड्यांमध्ये मुरले का? असा संतप्त सवाल सावंत यांनी सरकारला विचारला आहे.

  जलयुक्त शिवार योजनेच्या अपयशाचा पंचनामा

  हजारो कोटी खर्च करूनही राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाही सरकार असक्षम असेल तर या प्रकरणाची तात्काळ न्यायालयीन चौकशी करावी व जलसंधारण मंत्र्यांनी या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सावंत यांनी केली.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145