Published On : Tue, Mar 17th, 2020

नागपुरात कुख्यात शोबू सोहेल पिस्तुलासह गजाआड

नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने कुख्यात गुंड शोबू ऊर्फ अब्दुल सोहेल अब्दुल खालिक (वय २०) याला मंगळवारी दुपारी लकडगंजमध्ये अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल (माऊझर) तसेच दुचाकी असा ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हे शाखेच्या युनिट तीन पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, चंद्रशेखर मस्के, सहायक निरीक्षक पंकज धाडगे आणि त्यांचे सहकारी मंगळवारी दुपारी २.२० च्या सुमारास लकडगंज भागात गस्त करीत होते. त्यांना कुख्यात शोबू ऊर्फ सोहेल दुचाकीवर फिरताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ पिस्तूल आढळले. कुख्यात सोहेल हा सक्करदरा ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांना वॉन्टेड होता.