Published On : Sat, Aug 8th, 2020

नागपुरात अज्ञात तरुण चढला आकाशवाणी चौकातील टॉवरवर, यंत्रणेची भंबेरी

नागपूर: आकाशवाणी चौकातील टॉवरवर मनोज नावाचा तरुण चढल्याचे आढळले. हे वृत्त कळल्यावर त्याला खाली उतरवण्यासाठी यंत्रणेची भंबेरी उडाली. हे वृत्त लिहिस्तोवर त्या तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू होते.

मनोज नावाचा एक तरुण कुठल्याशा शाळेत काम करीत होता. त्याला नोकरीवरून काढून टाकल्याने तो निराश झाला होता. त्यातून त्याने हे कृत्य केले असावे अशी प्राथमिक माहिती आहे.