Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jul 7th, 2020

  नागपुरातील मानकापूर, पारडी, दिघोरी अजनीतील परिसर प्रतिबंधित

  नागपूर : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्रतिबंधित क्षेत्रातही दररोज वाढ होत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भीमनगर, रामदासपेठेतील क्रिम्स हॉस्पिटलमागील परिसर, मानकापूर, योगेंद्रनगर, एनआयटी ले-आउट अजनी, नागभूमी ले-आउट, भवानीनगर पारडी, हंसापुरी येथील दलालपुरा, दिघोरी काशनीथनगर, श्रीकृष्णनगर, न्यू डायमंडनगरातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

  आशीनगर झोन

  आशीनगर झोनअंतर्गत प्रभाग एकमधील भीमनगर परिसरातील दक्षिण पूर्वेस राजकुमार ललवानी, दक्षिण पश्‍चिमेस अन्नू डोंगरे, उत्तर पश्‍चिमेस विकास सरोज यांचे घर, उत्तर पूर्वेस सरिता सोनवले यांचे घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला.

  धरमपेठ झोन

  धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग 15 मधील रामदासपेठेतील क्रिम्स हॉस्पिटलमागील परिसरात उत्तरेस शोभा चिडाम, नारायण गेडाम, दक्षिणेस विजय उंबरकर व वैभव राऊत यांचे घरापर्यंतचा परिसर सील करण्यात आला.

  मंगळवारी झोन

  मंगळवारी झोनअंतर्गत मानकापूर, प्रभाग 10 मधील जयहिंदनगरातील परिसरातही निर्बंध लावण्यात आले. उत्तर पश्‍चिमेस समीर यांचे घर, उत्तर पूर्वेस रमेश काळे यांचे घर दक्षिण पूर्वेस रविना किराणा स्टोर्स, दक्षिण-पश्‍चिमेस जावेद खान यांचे घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला. याच प्रभागातील बोरगाव रोड योगेंद्रनगरातील उत्तर पूर्वेस विश्‍वनाथ सिंग, उत्तर पश्‍चिमेस आर. ऍस्टियन यांचे घर दक्षिण पूर्वेस सी. एस. सोनोने, दक्षिण पश्‍चिमेस ऍरोमा अपार्टमेंट परिसरात निर्बंध लावण्यात आले.

  नेहरूनगर झोन

  नेहरूनगर झोनअंतर्गत प्रभाग 28 मधील न्यू डायमंडनगरातील टिकले ले-आउट परिसरातील उत्तर पश्‍चिमेस चांदेकर यांचे घर, उत्तरेस जुनघरे यांचे घर, दक्षिणेस तुकाराम खडगी यांचे घर, दक्षिण पश्‍चिमेस रामेश्‍वरम अपार्टमेंटमधील परिसर सील करण्यात आला आहे.

  बैरागीपुरा, मानसेवानगरातील नागरिकांना दिलासा

  धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग 12 मधील मानवसेवानगरातील गजानन प्रसाद सोसायटीला प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आले आहे. रामदासपेठेतील इंद्रायणी हॉस्पिटलजवळील प्रतिबंधित क्षेत्रात घट करण्यात आली आहे. आता केवळ पंकज रघुकूल क्रिएशन ही इमारत प्रतिबंधित क्षेत्र आहे. नाईक तलाव बैरागीपुऱ्यातील प्रतिबंधित क्षेत्रातही घट करण्यात आली. रमेश अहीरकर, भाऊराव रणदिवे, गणपती बोकडे, महर्षी मेडिकल स्टोर्स, पांडुरंग निखारे यांचे घर, गोपाल दाते यांच्या घरापर्यंत निर्बंध आहेत.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145