नागपूर –पारडी परिसरातील शारदा नगर येथे मंगळवारी दुपारी बिबट्या दिसल्याची घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. प्रकाश हायस्कूललगत असलेल्या सुमारे सहा वर्षांपासून बंद असलेल्या लोहा कारखान्याच्या सुनसान परिसरात बिबट्याची उपस्थिती आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कारखाना परिसरात काम करणाऱ्या काही मजुरांच्या नजरेस अचानक बिबट्या पडला. क्षणार्धात अफरा-तफरी माजली. जीव वाचवण्यासाठी मजुरांनी धाव घेत कारखाना मालकाला माहिती दिली. त्यानंतर तत्काळ वन विभागाला अलर्ट करण्यात आले.
माहिती मिळताच वन विभागाचे राउंड ऑफिसर जीवन पवार यांच्या नेतृत्वाखाली ४ ते ५ कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. मात्र, तोपर्यंत सायंकाळ झाली होती. परिसरात दाट झुडपे आणि अंधार असल्याने तत्काळ शोध किंवा रेस्क्यू मोहीम हाती घेता आली नाही. त्यामुळे नागरिकांमधील दहशत अधिकच वाढली.
झुडपांनी व्यापलेला कारखाना, बिबट्यासाठी सुरक्षित आसरा-
स्थानिक नागरिकांच्या मते, दीर्घकाळापासून बंद असलेला हा लोहा कारखाना आता झुडपे व झाडांनी पूर्णतः व्यापलेला असून परिसर लहान जंगलासारखा बनला आहे. त्यामुळे बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्याला येथे लपण्यासाठी पोषक वातावरण मिळत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमुळे भीतीत भर-
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. गेल्या शनिवारी पहाटे सुमारे ३.३५ वाजता देशपांडे ले-आउटमधील एका घराच्या भिंतीवरून बिबट्या चालताना दिसल्याचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. जैन नावाच्या नागरिकाच्या घराजवळील हा व्हिडीओ परिसरात चर्चेचा विषय ठरला असून नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे.
याआधीही बिबट्या हल्ल्यांच्या घटना-
पारडी व आजूबाजूच्या भागात याआधीही बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरिक अधिकच धास्तावले आहेत. बिबट्या दिसल्याची बातमी पसरताच अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले, मुलांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आणि परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला.
रेस्क्यू टीम उशिरा पोहोचल्याने प्रश्नचिन्ह-
सूत्रांच्या माहितीनुसार, वन विभागाकडे सध्या केवळ दोनच रेस्क्यू टीम उपलब्ध असून त्या मंगळवारी कलमेश्वर व रामटेक परिसरात कार्यरत होत्या. त्यामुळे पारडीमध्ये रेस्क्यू टीम उशिरा पोहोचली. अंधारामुळे मंगळवारी शोधमोहीम स्थगित करावी लागली.
वन विभागाच्या डीएफओ सुनीता व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी बंद लोहा कारखाना परिसरात सघन शोध आणि रेस्क्यू मोहीम राबवण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी मोहीम पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या ठिकाणी टीम पाठवण्यात येईल, असे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन-
वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, बिबट्या दिसलेल्या परिसरात अनावश्यक ये-जा टाळावी, गर्दी करू नये आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ वन विभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी. प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
सध्या पारडी परिसरात भीतीचे वातावरण असून बुधवारी होणाऱ्या सघन शोधमोहीमेवर सर्वांचे लक्ष लागून आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
युवती के घर में घुसकर अश्लील हरकत #vidarbhanews #nagpur #newsupdate #crimenews #vidarbha
MHT-CET रिजल्ट पर बवाल! #MHTCET #MaharashtraNews #Congress #BJP #DevendraFadnavis #ExamResult
पुलिस कस्टडी से फरार 'इक्का' गिरफ्तार #nagpurnews #Crime #PoliceAction #Arrest #MaharashtraNews
नशे और ऑनलाइन जुए की लत ने बनाया चोर! #Nagpur #NagpurCrime #CrimeNews...
सामान्य सभा स्थगित, विपक्ष का बड़ा आरोप #NagpurNews #NMC #CivicIssues #Budget2026 #Opposition...





