Published On : Tue, Feb 9th, 2021

नागपूर मेट्रोचे कार्य अतुलनीय : फ्रान्स राजदूत

Advertisement

– फ्रान्स राजदूत हिज एक्सेलंसी इमॅन्युएल लेना यांची नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट

नागपूर – फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेना यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सच्या एका उच्चपदस्थ शिष्टमंडळाने आज (९ फेब्रुवारी) रोजी महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला भेट दिली. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कार्याची माहिती घेण्याकरिता हे शिष्टमंडळ नागपुरात आज आले होते. शिष्टमंडळातील इतर सदस्य श्रीमती. ओलिविया बेल्मेर( सल्लागार) ,श्रीमती. सोनिया बार्बरी (कॉन्सेल जनरल), श्री. जॅकी एम्प्रु, (प्रादेशिक संचालक-दक्षिण आशिया) आणि श्री. ब्रुनो बोल, (संचालक-कंट्री) हे देखील यावेळी उपस्थित होते.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महा मेट्रोचे प्रशासकीय कार्यालय – मेट्रो भवन मधील अनुभव केंद्र आणि बॅकअप ऑपरेशनल कंट्रोल सेंटरला (बीओसीसी) या फ्रेंच शिष्टमंडळाने भेट दिली. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, संचालक (वित्त श्री. एस. शिवमाथन, कार्यकारी संचालक (प्रशासन) श्री. अनिल कोकाटे यावेळी उपस्थित होते. या नंतर संपूर्ण चमू ने हिंगणा मार्गावरील लिटल वूडला भेट दिली तसेच लिटिल वुड येथे महा मेट्रोच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सेफ्टी पार्कची पाहणी केली. तसेच लिटिल वुड ते वासूदेव नगर मेट्रो स्टेशन पर्यंत महा मेट्रोच्या फिडर सेवा ई-रिक्षा ने मेट्रो स्टेशन पर्यंत प्रवास त्यानंतर संपूर्ण शिष्टमंडळाने ऍक्वा लाईन मार्गिकेवरील वासुदेव नगर ते सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रोने इतर प्रवाश्यान सोबत प्रवास केला.
तसेच सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे विस्तृत प्रस्तुतीकरण करण्यात आले.

नागपूर मेट्रोचे कार्य अतुलनीय : फ्रान्स राजदूत
शहराच्या अंतर्गत असलेल्या दळण वळणा संबंधी मेट्रोसह आज नागपुरातील काही प्रकल्पांना भेट दिली. नागपुरातील मेट्रोचे काम बघून मी प्रभावित झालो. मेट्रो चमू ने चांगले कार्य नागपूर शहरात केले आहे तसेच शहरामध्ये चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली आहे. महत्वाचे म्हणजे पर्यावरणा संवर्धनाकरता सोलर पॅनल सारखे उपकरण मेट्रो स्टेशन येथे स्थापित केले आहेत जो कि परिवाराण संबंधीचा उत्तम नमुना आहे. महा मेट्रोने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण देखील केले आहे. नागपूर माझ्या देशाकरता अतिशय महत्वाचे आहे. मेट्रो मुळे शहराच्या विकासात निश्चितच भर होत आहे.

यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी फ्रान्स राजदूत यांना नागपूर मेट्रोचे मॉडेल व महा कार्ड भेट दिले.

Advertisement
Advertisement