Published On : Fri, Sep 24th, 2021

खड्डे बुजविण्यासंदर्भात मनपातर्फे झोनस्तरीय कार्यवाही

शुक्रवारी धरमपेठ, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग झोनमध्ये कार्यवाही

नागपूर : नागपूर शहरातील मुख्य मार्ग व अंतर्गत मार्गांवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात मनपाच्या हॉटमिक्स प्लाँट विभागातर्फे सर्व झोनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. या कार्यवाही अंतर्गत शुक्रवारी २४ सप्टेंबर रोजी धरमपेठ, धंतोली, नेहरूनगर आणि गांधीबाग झोनमधील विविध मार्गांवरील खड्डे बुजविण्यात आले.

Advertisement

शुक्रवारी (ता.२४) धरमपेठ झोनमधील इंद्रायणी स्पेशॅलिटी हॉस्पिटल रोडवरील १२ खड्डे बुजविण्यात आले व ८५ वर्गमीटर रस्त्याचे दुरुस्ती कार्य करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत रेल्वे पुलाखालील व रोडवरील १७ खड्डे बुजवून १५५ वर्गमीटरचे कार्य करण्यात आले.

Advertisement

नेहरूनगर झोन अंतर्गत निर्मल नगरी समोरील शितला माता मंदिर ते हसनबाग रोडवरील १५ खड्डे बुजवण्यात आले व १५० वर्गमीटरचे दुरुस्ती कार्य करण्यात आले. तर गांधीबाग झोन अंतर्गत हज हाऊस दवा मार्केट रोडवरील खड्डे दुरुस्ती काम करण्यात आले.

नागपूर शहरातील झोननिहाय खड्ड्याचे करण्यात आलेले सर्वेक्षण आणि विविध वृत्तपत्र यामधील प्रकाशित खड्ड्यांच्या फोटोनुसार हॉटमिक्स विभागाद्वारे दुरुस्तीबाबत दैनंदिन कार्यवाही करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement