Published On : Mon, Nov 4th, 2019

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी झाली प्रसिद्ध

Advertisement

कामठी:-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना दिलेल्या वेगानुसार 30 ऑक्टोबर 2019 रोजीच्या आदेशानुसार मतदार यादी तयार करण्याच्या कामाला गती देण्यात आली यानुसार नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कामठी तालुक्यातील चार जिल्हा परिषद सर्कल तसेच 8 पंचायत समिती सर्कल ची गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी आज 2 नोव्हेंबर ला कामठी तहसिल कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली.

यानुसार नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कामठी तालुक्यात कोराडी, येरखेडा , गुमथळा,वडोदा, या चार परिषद सर्कल चा समावेश होत असून कामठी पंचायत समिती अंतर्गत कोराडी,कवठा,येरखेडा, भीलगाव, गुमथळा, महालगाव, वडोदा, बिडगाव या आठ पंचायत समिती सर्कल चा समावेश आहे.आज 2 नोव्हेंबर ला जाहीर झालेल्या जिल्हा परोषद निर्वाचक गटनिहाय प्रारूप मतदार यादी नुसार कोराडी जिल्हा परिषद सर्कल मध्ये 27 हजार 456 मते, येरखेडा जी प सर्कल मध्ये 30 हजार 544 मते, गुमथळा जी प सर्कल मध्ये 23 हजार 203 मते तर वडोदा जी प सर्कल मध्ये 21 हजार 94 मते तसेच कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादीनुसार कोराडी -14 हजार 695 मते, कवठा-12 हजार 801 मते, येरखेडा -16 हजार 364 मते, भिलगाव -14 हजार 180 मते, गुंमथळा-10 हजार 884मते,महालगाव 10 हजार 319 मते, वडोदा-13 हजार 303 मते तर बिडगाव -17 हजार 791 मते अशे एकूण 1 लक्ष 12 हजार 297 मतांची नोंद आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या जाहीर प्रारूप मतदार यादीवर 6 नोव्हेंबर पर्यंत हरकती व सूचना तहसिकदार अरविंद हिंगे यांच्याकडे दाखल करता येतील , 8 नोव्हेंबर रोजी मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केल्या जातील , 11 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल .

बॉक्स:-अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे यानुसार एक महिन्याच्या आत निवडणुका जाहीर होणार असल्याने जवळपास 13 वा 14 डिसेंबर ला जी प , पंचायत समिती निवडणुका लागण्याच्या चर्चेला उधाण आहे

Advertisement

संदीप कांबळे कामठी

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges