
Screenshot
नागपूर : नागपूर शहरातील युवा सेनेच्या संघटनात्मक विस्ताराला वेग देण्यासाठी निलय राजेंद्र कश्यप यांची शिवसेना युवा सेनेच्या नागपूर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बर्डी येथे आयोजित ‘वंदे मातरम्’ कार्यक्रमात शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर निलय कश्यप यांनी युवकांना संघटित करून सामाजिक प्रश्न, जनहिताचे मुद्दे आणि राष्ट्रहिताच्या विषयांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास, क्रीडा आणि नागरी सुविधांसह युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युवकांचा शिवसेनेत प्रवेश-
‘वंदे मातरम्’ कार्यक्रमादरम्यान विविध भागांतील युवकांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. निलय कश्यप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तरुणांनी संघटनेत सक्रियपणे काम करण्याची भूमिका घेतली. या पक्षप्रवेशामुळे नागपूर शहरातील युवा सेनेच्या संघटनात्मक ताकदीत वाढ झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
युवकांशी थेट संपर्क वाढवून त्यांच्या समस्या जाणून घेणे, नव्या कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडणे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचणे, यावर आगामी काळात भर दिला जाणार आहे.
निलय कश्यप यांच्या नियुक्तीमुळे नागपुरातील युवा सेनेला नवे नेतृत्व मिळाले असून, युवकांच्या वाढत्या सहभागामुळे संघटनेच्या विस्ताराला चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेची आगामी वाटचाल कशी राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



