नागपूर : शहरातील अंबाझरी परीसरात असेलल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.कुणाल किशोर साल्पेकर (३६) असे मृतकाचे नाव आहे. ते आयटी प्राध्यापक होते
माहितीनूसार, साल्पेकर गेल्या दोन महिन्यांपासून तलावात पोहायला जात होते. रोज रात्री ८ वाजता ते सरावासाठी जात होते. पूलमध्ये एका दोरीला पकडून ते पाण्यात खाली जाऊन वर येत होते. ते खाली गेले व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले. तर वर आलेच नाही. ही बाब समजल्यावर लाईफगार्डने त्यांना बाहेर काढले.पण तो पर्यंत फार उशीर झाला होता. त्यांना तातडीने मेडिकलमध्ये नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी साल्पेकर यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती बजाजनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली.पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
एनआयटी प्रशासनाच्या कार्यप्रणालीकडे बोट –
या घटनेमुळे एनआयटीच्या स्विमिंग पूलच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. साल्पेकर पोहत असतांना तिथे लाईफगार्ड उपस्थित होते. मात्र तरीही ही घटना घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उन्हाळा सुरू असल्याने एनआयटीच्या स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग शिकण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे. मोठ्यापासून तर लहान मुलेदेखील मोठ्या प्रमाणात याठिकाणी पोहायला येतात. त्यातच असा प्रकार झाल्याने यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.