Published On : Thu, Apr 5th, 2018

युवक काँग्रेसचे हुक्कापार्लर विरोधात आंदोलन: पोलिसांचा अडथळा कार्यकर्त्यांशी शाब्दिक चकमक


नागपूर: देशाचे भविष्य युवा पिढीला व्यसनाच्या आहारी व व्यवसायधींन करण्याचे मागे आता हुक्कापार्लर च्या माध्यमातून अनेक तरुण तरुणी आपले आयुष्य बर्बाद करीत आहे. आज नागपूर लोकसभा युवक काँग्रेसने अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे महासचिव अलोक कोंडापुरवार, महासचिव फझलूर कुरेशी यांच्या नेतृत्वात रविनगर येथील कोपा हुक्कापार्लर व त्या परिसरातील हुक्कापार्लर बंद करण्यासाठी गेलेल्या युवक काँग्रेसच्या आंदोलनात पोलिसांनी अडथळा आणला व शाब्दिक चकमक झाली अनेकदा युवक काँग्रेसने पोलीस आयुक्त व पोलीस विभागाला हुक्कापार्लर बंद करण्याबाबत सांगण्यात आले. पण त्यांच्याच आश्रयाने सर्रास पणे हुक्कापार्लर सुरू आहे.

हुक्कापार्लर मध्ये अवैध पणे दारू व मादक पदार्थाची विक्री होते व जुगार ही खेळल्या जातो. पोलीस विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे नेहमीच पोलीस युवक काँग्रेसच्या आंदोलनात अडथळा निर्माण करून आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नात असतात. तरुणाचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या या धंद्याला कोणाचा राजाश्रय आहे ? हुक्कापार्लर चे संचालक राजरोस पणे आपला कारोभार सुरू ठेवत आहे हे सर्व हुक्कापार्लर ताबडतोब बंद झाले नाही तर नागपूर लोकसभा युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करून हुक्कापार्लर बंद पाडेल याला सर्वश्री प्रशासन जबाबदार राहील या आंदोलनानंतर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते अंबाझरी पोलीस स्टेशन ला पोहोचले. तेथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.खनदाळे यांना हुक्कापार्लर बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले.


आजच्या या आंदोलनात आलोक कोंडापुरवार,फजलूर कुरेशी, राजेंद्र ठाकरे,अक्षय घाटोळे,हेमंत कातुरे,स्वप्नील ढोके,बाबू खान,सागर चव्हाण,अखिलेश राजन,फरदिन खान,आशिष लोणारकर, देवेंद्र तुमाने, अतुल मेश्राम, पंकेश निमजे,नकील अहमद,रजत खोब्रागडे,चेतन डाफ,वरून पुरोहित,विजय मिश्रा, हर्षल धुर्वे,राहुल मोहोड,सौरभ निंबाळकर,नमन विलियम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.