| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Feb 3rd, 2018

  म.न.पा तील भ्रष्टाचार च्या प्रदूषणामुळे मास्क लावून युवक काँग्रेस ने केले अभिनव आंदोलन : महापौरांना घेराव


  नागपूर: नागपूर महानगर पालिकेच्या टाऊन हॉल येथील आमसभे दरम्यान नागपूर लोकसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात व युवक काँग्रेस पदाधिकारी वसीम शेख,पंकेश निमजे, प्रफुल्ल इंजनकर ह्यांच्या नेतृत्वात नागपूर म.न.पा च्या भ्रष्टाचाराचा वास ईतका पसरला आहे की युवक काँग्रेसने मास्क लावून अभिनव आंदोलन केले व म.न.पा चा फलक लावून अर्थ काढला म.न.पा म्हणजेच मला नगदी पाहिजे.

  रेशीमबाग मैदान येथे महिला उद्योजिका महोसवाचे मंडप डेकोरेशन चे काम नियमबाह्य प्रकारे देण्यात आले. या बाबत महापौरांना घेराव घालून वस्तूस्थिती मांडली तेव्हा महापौरांनी आश्चर्य व्यक्त केले. नगरसेवक बंटी शेळके म्हणाले की म.न.पा अधिकाऱ्यावर दबाव टाकून कमी दराची निविदा डावलून ज्या कंत्राटदाराची जास्त निविदा होती त्या ऍडमार्क इव्हेंट कंपनीला देण्यात आली ही सरळ सरळ अनियमितता आहे. एकूण ६ निविदा मागविण्यात आल्या होत्या त्यात अरुण नागभीडकर ३०% कमी दर, स्टार डेकोरेटर २६% कमी दर, क्रांती डेकोरेशन २३% कमी दर,दाता डेकोरेटर अंदाजित रक्कम व ऍडमार्क इव्हेंट यांची ९.७०% जास्त दराची निविदा भरली होती नियमाप्रमाणे कमी दराची निविदा स्वीकारली जाते.पण सत्ताधारी पक्षाच्या मर्जीतील ऍडमार्क या कंपनीला कुठलाही अनुभव नसतांना कोणाच्या मर्जीने सर्व नियम धाब्यावर बसवून काम दिले.

  पारदर्शकतेच्या बाता मारणारे ना खाऊंगा ना खाने दुगा म्हणणारे कुठल्या नियमाने निविदा स्वीकारली नियमबाह्य प्रकारे झालेला प्रकार म्हणजे खाऊगा लेकींन खाने नही दुगा असे आहे.


  नागपूर लोकसभा युवक काँग्रेसने त्वरित ही निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.अन्यथा कडक आंदोलन केले जाईल असा ईशारा दिला आजचा या आंदोलनात प्रामुख्याने नगरसेवक नितीन साठवणे, नगरसेवक परसराम मानवटकर,नगरसेवक दिनेश यादव, नगरसेविका आयेशा उईके,वसीम शेख, पंकेश निमजे,प्रफुल्ल इंजनकर,राजेंद्र ठाकरे, अक्षय घाटोळे, सौरभ शेळके, स्वप्नील ढोके, राज बोकडे, हेमंत कातुरे, पूजक मदने, आशिष लोणारकर, फजळूर कुरेशी, नितीन गुरव, विजय मिश्रा, नितीन सुरुशे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145