नागपूर : वर्दळीच्या वर्धा रोडवरील खड्डय़ांनी व्यापलेल्या उड्डाणपुलाच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी चिंचभवन बसस्थानक ते खापरी उड्डाणपुलापर्यंत निषेध मोर्चा काढला.
दक्षिण पश्चिम युवक काँग्रेसचे सरचिटणीस अमर मेंढे म्हणाले की, स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नागपुरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे याठिकाणी अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यावेळी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमर म्हणाले की त्यांनी राष्ट्रीय महामार्ग पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा उचलला आहे,
परंतु त्यांनी स्पष्टपणे सांगितले की रस्ता आणि उड्डाणपुलाचा हा पॅच रेल्वेखाली आहे. गुरुवारी सकाळीही घटनास्थळी अपघात झाल्याचा आरोप एसडब्ल्यू युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रणित मोहड यांनी केला.