Published On : Sat, Nov 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात MD ड्रग्ससह 24 वर्षीय युवक अटकेत; ‘माया भाई’ पोलिसांच्या रडारवर

Advertisement

पांचपावली में आधी रात MD ड्रग्स के साथ युवक गिरफ्तार, ‘माया भाई’ की तलाश
नागपूर -नागपुरात अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांनी कारवाई करत आसीनगर परिसरातून MD ड्रग्ससह एका 24 वर्षीय युवकाला अटक केली. पाचपावली पोलिसांनी मध्यरात्री सलीम स्पोर्ट्स ग्राउंड परिसरात धाड टाकून साहिल अहमद फहीम उद्दीन मलिक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 16 ग्रॅम MD पावडर जप्त करण्यात आली असून, या प्रकरणात ‘माया भाई’ नामक ड्रग्स पुरवठादाराचाही शोध सुरू आहे.

पोलिसांना आसीनगर परिसरात अमली पदार्थांची देवाणघेवाण सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पाचपावली पोलिसांच्या डीबी पथकाने घटनास्थळी धाड टाकली. पंचांच्या उपस्थितीत आरोपीची झडती घेतली असता, त्याच्याकडे MD ड्रग्स आढळून आले. पोलिसांनी ड्रग्स, मोबाईल फोन आणि रोख रकमेसह एक लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीला ड्रग्स पुरवणारा सोहेल मलिक उर्फ ​​‘माया भाई’, रा. टेकावस्ती, याचा शोध घेतला जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.