
नागपूर : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आनंद व्यक्त करत पक्ष नेतृत्व व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
“तुमची आमची, भाजपाची सर्वांची! असे म्हणत गडकरी यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यभरातील समस्त भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि संघटनात्मक ताकदीचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर विश्वास ठेवत जनतेने पुन्हा एकदा भाजपला साथ दिल्याबद्दल गडकरी यांनी मतदारांचे आभार मानले. हा जनतेच्या विश्वासाचा कौल असून, आगामी काळातही विकासकामांच्या माध्यमातून हा विश्वास सार्थ ठरवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Advertisement








