| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Mar 25th, 2017

  उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी योगी आदित्यनाथ यांनी मागितली देवेंद्र फडणवीसांकडे मदत


  मुंबई: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर योगी आदित्यनाथ यांची निवड करण्यात आली. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेताच नव्या निर्णयांचा सपाटा लावला आहे. योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांनी भूरळ घातल्याचं पहायला मिळत आहे. कारण, योगी आदित्यनाथ यांनी फडणवीसांना फोन करुन त्यांनी केलेल्या योजनांची माहिती मागवली आहे.

  Bhaskar.com ने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही योजनांनी आदित्यनाथ प्रभावित झाले आहेत. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यांमुळे राज्यात यशस्वी झालेल्या पाच योजनांची आदित्यनाथ यांनी माहिती मागवली आहे. तसेच यासंदर्भात सध्या मंत्रालयात माहिती संकलनाचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे.

  उत्तरप्रदेशला ‘उत्तम’ करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी भाजप शासित राज्यांतील विकास योजनांची माहिती मागवली आहे. राजस्थान, गोवा आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, आपले सरकार या योजनांसह सहकार व उर्जा खात्याची माहिती मागवली आहे.

  योगी आदित्यनाथ यांनी या योजनांची मागवली माहिती
  वायफाय नेटवर्क: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या आयटी विभागाकडून मुंबईत सुरु करण्यात आलेली वायफाय नेटवर्क योजना म्हणजे सार्वजनिक भागातील जगातलं सर्वात मोठं वायफाय नेटवर्क मानलं जातं. सध्या येथे ४०० हॉटस्पॉट कार्यरत असून ही संख्या एक मे पासून १२०० पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

  आपले सरकार: आपले सरकार या वेबसाईटच्या माध्यमातून जनता आपल्या तक्रारी सरकारच्या विविध विभागांपर्यंत थेट पोहचवू शकते.

  जलयुक्त शिवार: महाराष्ट्रातील मराठवाड्यासारख्या काही भागांप्रमाणेच उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडमध्येही दुष्काळाची मोठी समस्या आहे. त्यामुळे या धर्तीवर उत्तर प्रदेशात जलयुक्त शिवार योजना राबवण्याचा योगी आदित्यनाथ यांचा प्लॅन आहे. यापूर्वी राजस्थान सरकारनेही जलयुक्त शिवार योजनेत रस दाखवला होता.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145