होय, मी युती सरकारचा नायनाट करणारे विषारी औषधच!

Vikhe Patil
नागपूर: होय, मी भाजप-शिवसेना युती सरकारचा नायनाट करणारे विषारी औषध असल्याचे चोख प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे.

विखे पाटील हे विषारी औषध असल्याचे प्रसिद्धी पत्रक काल शिवसेनेने काढले होते. त्याला उत्तर देताना विखे पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार पलटवार केला. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, भाजप आणि उद्धव ठाकरे, हे दोघेच या सरकारचे खरे लाभार्थी असल्याचे विधान मी केले होते. सत्य हे कटू असते आणि ते उद्धव ठाकरेंना खुपल्यामुळे त्यांनी मला विषारी औषधाची उपमा दिली आहे. परंतु, ही टीका म्हणजे माझ्या कामाची पावती आहे.

हे सरकार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला बोंडअळी आणि तुडतुड्याचा रोग आहे. ‘बी फॉर बीजेपी’ म्हणजे ‘बी फॉर बोंडअळी’ तसेच ‘टी फॉर तुडतुडा’ म्हणजे ‘टी फॉर ठाकरे’ आहे. हे रोग नष्ट करण्यासाठी मी विषारी औषध असणे राज्याच्या हिताचे आहे आणि म्हणून मी या लोकविरोधी सरकारविरोधात विषारी औषधासारखेच काम करीत राहणार, असेही विरोधी पक्षनेते म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisementss
Advertisement
Advertisement
Advertisement