Published On : Sat, Jun 15th, 2019

येरखेडा – रनाळा येथील सर्व नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्थायी पट्टे व घरे मिळणार

पालक मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे

कामठी: कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या येरखेडा व रणाळा गावातील सर्व नागरिकांना ‘सर्वाना घरे 2022 ‘प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्थायी पट्टे व घरे मिळणार असून कुणीही निवासी सोयीपासून वंचित राहणार नाही असे मौलिक प्रतिपादन राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री ना . चंद्रशेखर बावनकुळे यांनी येरखेडा येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले

Advertisement

यावेळी जिल्हा परिषद सदस्या संगीता रंगारी, कामठी पंचायत समितीचे सभापती अनिता चिकटे ,उपसभापती देवेंद्र गवते ,येरखेडा चे सरपंच मंगला कारेमोरे, उपसरपंच शोभाताई कराडे , रणाळ्या चे सरपंच सुवर्णा साबळे ,उपसरपंच आरती खुल्लकर, माजी जी प सदस्य अनिल निधान,भाजप तालुकाध्यक्ष रमेश चिकटे,येरखेड्याचे माजी सरपंच मनीष कारेमोरे,अरुण पोटभरे ,पंकज साबळे ,मनोज चौरे, मोहन माकडे, माजी सभापती वसंत काळे, रणाल्याचे उपसरपंच आरती कुलर कर, ग्रामपंचायत सदस्य अनिल भोयर, सुमित दुपारे, वनिता नाटकंर ,निकिता अनिल पाटील, नरेश मोहबे, गजानन तिरपुडे, राजश्री ढवले उमेश महाले ,प्रवीण लुटे ,घनश्याम नाव धीगे, अमोल घडले , मनोज धानोर कर , कोविद तळेकर,आदी उपस्थित होते.

Advertisement

या जण संवाद कार्यक्रमात नागरिकांनी येरखेडा रणाळा येथे स्थायी पट्टे वाटप व प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाची मागणी केली, सोबतच यशोधरा नगरातील पोलीस चौकी ,येरखेडा रणाळ्यात उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी केली, येरखेडा रंनाळ्यात पाणीपुरवठा योजना, दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सिमेंट रोड व नाली बांधकाम करता निधीची मागणी करण्यात आली ,येरखेडा रनाळा परिसरात अवैध धंदा बंद करण्याची मागणी काही नागरिकांनी केली, पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांनी मांडलेल्या समस्या त्वरित सोडवण्याकरता तहसीलदार अरविंद हिंगे, पंचायत पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी ,ठाणेदार बापू ढेरे ,विद्युत वितरण कंपनीच्या अभियंता दिलीप मदने यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन नागरिकांनी मांडलेल्या समस्या त्वरित सोडण्यात येणार असल्याचे सांगितले जनसंवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले जण संवाद कार्यक्रमात नागरिकांनी मांडलेल्या समस्या सोडविण्याकरिता शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येइल येरखेडा व रनाल्याच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालकमंत्री यांचे स्वीय सचिव शिवराज पडोळे यांनी केले उपसभापती संचालन देवेंद्र गवते यांनी केले व आभार प्रदर्शन अरुण पोटभरे यांनी मानले जनसंवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रनाळा येरखेडा येथील नागरिक उपस्थित होत.

– संदीप कांबळे कामठी

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement