मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिना कर्करोगाच्या तिसऱ्या स्टेजमध्ये आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर चाहत्यांना पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
हिना खानने ही पोस्ट शेअर करताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.
हिना खानने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, सर्वांना नमस्कार, जे लोक माझ्यावर प्रेम करतात आणि काळजी घेतात. त्यांच्यासाठी मी एक बातमी शेअर करणार आहे. मला स्टेज 3 चा ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. हे माझ्या आयुष्यातील पुढचे आव्हान आहे.
मात्र मी ठीक आहे. मी मजबूत, दृढनिश्चयी आहे आणि या आजारावर मात करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. माझे उपचार सुरू झाले आहेत आणि यातून आणखी मजबूत होण्यासाठी मी जे काही आवश्यक आहे ते करण्यास तयार आहे,असे हिनाने पोस्टमध्ये म्हटले.