
नागपूर : नागपूर .. आप नं मुझे कॉँग्रेस बनके सुनना, ना भाजपा बनके सुनना, ना हिंदू ना मुसलमान बनके सुनना, ये ढाई घंटा बस हिंदुस्तान बनके सुनना या ओळी सादर करून कवि दिनेश बावरा यांनी उपस्थितांची मने जिंकली.
हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025’ मध्ये शनिवारी नवव्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात अखिल भारतीय हिंदी कविसंमेलन संपन्न झाले. यात देशभरातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि लोकप्रिय कवि हरिओम पंवार, दिनेश बावरा, इंदोरचे नावाजलेले कवि सुदीप भोला, अंकिता सिंह, तेजनारायण शर्मा व अमन अक्षर यांचा सहभाग होता. कविसंमेलनाचे सूत्र संचालन कवि दिनेश बावरा आणि दयाशंकर तिवारी यांनी केले.
कवींनी सूत्र हाती घेतली आणि राजकारणासह अनेक विषयांवर कोट्या केल्या. कवि दिनेश बावरा म्हणाले की ‘मला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिले यावरून प्रतिभेला संधि द्यायला हवी ही शिकवण इतर पक्षांनी घ्यावी’ असा चिमटा त्यांनी काढला.
गडकरी यांनी अतिशय प्रसिद्ध प्रभात वड्याचा उल्लेख केला विडिओ व्हायरल झाला, त्यावर देखील त्यांनी कोटी केली. ‘ प्रभात वडा’ आता लोक रात्री-आपरात्री देखील शोधत आहे, असे ते म्हणाले.
यानंतर सर्व कवींनी विविध रस आणि व्यंग असलेल्या कविता सादर करून सर्वांची वाहवा मिळवली. नागपूर का संतरा सबेरे छिल के खाते है और रात को खोल के पिते है वर खूप टाळ्या वाजल्याआजच्या कार्यक्रमाची सुरवात केंद्रीय मंत्री व खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रणेते मा. श्री. नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, आमदार संदीप जोशी, आमदार प्रवीण दटके, डॉ लोकेन्द्र सिंह, श्रीमती मधुलिका मधुप पांडे, दैनिक भास्कर चे संपादक मणीकांत सोनी, डॉ. नीरज व्यास, डॉ. सागर खादीवाला, डॉ गोविंद प्रसाद उपाध्याय, डॉक्टर सतीशजी लखोटिया या सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून केली.
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांचे सहकार्य लाभत आहे.
‘ज्ञानियांचा राजा’ने उलगडला संत ज्ञानेश्वरांचा जीवन प्रवास-
स्थानिक बालकलाकारांचे दमदार सादरीकरण
यावर्षी संत ज्ञानेश्वरांच्या ७५०व्या जयंती आहे. त्यानिमित्त बालकला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ मिळून ‘ज्ञानियांचा राजा’ हा नृत्य, नाट्य आणि संगीताने सजलेला कार्यक्रम सादर केला. यात नागपुरातील विविध शाळांमधील जवळपास 450 बालकलाकारांचा सहभाग होता. संत ज्ञानेश्वरांच्या बालपणापासून समाधीपर्यंतच्या जीवनप्रवास या कार्यक्रमातून उलगडला गेला. ज्ञानेश्वर माऊलींचे कार्य अत्यंत कमी वेळात जिवंत करण्याचा स्तुत्य उपक्रम साडेचारशे बालकलाकारांनी केला. त्यांच्या जीवन चरित्र मधले महत्त्वाचे प्रसंग साकारून अक्षरशः त्यांनी उपस्थित सर्वांची मोठी दाद मिळवली. त्यानंतर या कलाकृतीशी संबंधित सर्वांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार संदीप जोशी, संस्कारभारतीच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी यांच्या हस्ते सत्कार आणि सन्मान करण्यात आला. संहिता लेखक विक्रांत सालपेकर, दिग्दर्शक सचिन बक्षी, मार्गदर्शक गोविंद गढीकर, गायन मार्गदर्शक आदित्य सावरकर आणि लक्षती काजळकर, कथक मार्गदर्शक प्रियंका अभ्यंकर, भरतनाट्यम् मार्गदर्शक ऋषिकेश पोहनकर, अभिनय मार्गदर्शक अभिषेक बिल्लावर आणि शरयू मते. बालकला अकादमीचे सचिव सुबोध अष्टीकर, सदस्य पल्लवी देशमुख, अनिता सुरकार, स्नेहल इंगळे, डॉ. संपदा नासेरी, पूर्वा सालपेकर तसेच रवींद्र आणि सीमा फडणवीस यांचा देखील सत्कार करण्यात आला. मधुरा गडकरी गडकरी यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
रांगोळी कलाकारांचा सत्कार-
खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये दररोज सुंदर रांगोळ्या काढण्यात येतात त्या रांगोळी कलाकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यामध्ये राधा कावडे, दिपाली हरदास,श्रीकांत बंगाली,आरती दुबळे,पूजा बोडके, सुजाता देशपांडे,सुप्रिया देशमुख,स्वप्नील नवलाखे,राधा आतकरी,कोकिळा ठाकरे,सुजाता बोडके, रेणुका बिडकर,रंजना जंजाळ,मानसी आयचित, प्रगती सरोदे,भाग्यश्री जोशी, राधा पांडे, आणि विनय बर्डे रत्ना कुलकर्णी निहारिका देवगडे योगेश हेडाऊ आणि वर्षा रेहपाडे यांचा सत्कार करण्यात आला.











