Published On : Tue, Jul 28th, 2015

यवतमाळ : पुसदच्या शिवसेना शाखा तर्फे कुपोषित बालकांना पोषण आहार किटचे वाटप

 

shivasena kuoshit karykram
पुसद (यवतमाळ)।
शिवसेना सत्तेत असो किंवा नसो परंतु 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करते. शिवसेना स्थापनेला 50 वर्षे पुर्ण झाल्याबदद्ल मागील महिन्यात शालेय विद्याथ्र्यांना कमी दराने वहया वाटप केले आणि आज शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्य संपुर्ण जिल्हयात कुपोशीत बालकांना मोफत औषधी व पोषण आहार व व्हिटामिन किटचे वाटप करण्यात आले. हा जनतेसाठी व गोर गरीबांसाठी स्तुत्य उपक्रम आहे. असे प्रतिपादन अॅड. विवके देशमुख यांनी केले.

पुसद येथील लिंगायत मठात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य 90 कुपोशीत बालकांची तपासणी व पोषण आहार व्हिटामीन किट वाटपाचा कार्यक्रम शिवसेनेच्यावतीने राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. संजय भांगडे होते. प्रमुख पाहुण म्हणुन डाॅ. उमेश रेवणवार, डाॅ. खांबाळकर, रवि देशपांडे, अनिल चेंडकाळे, अॅड. विवके देशमुख, राजन मुखरे, राजेंद्र साकला, अॅड. उमाकांत पापीनवार, रवी पांडे, चंदा गुरूवाणी, संजिवनी आगासे आदी मोठया संख्येने उपस्थित हेाते.

या प्रसंगी डाॅ. उमेश रेवणवार यांनी गोर गरीब कुपोशीत मुलांना पोषण आहार व व्हिटामिनचे वाटप करण्यात आले. हा एक सामाजिक उपक्रम असुन यापुढेही असेच कार्यक्रम राबविले जाणार असल्याचे जिल्हा उपप्रमुख अॅड. उमाकांत पापीनवार यांनी शिवसेना पक्ष उध्दव ठाकरे यांनी वाढदिवसा निमित्यच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची माहिती सांगीतली. कार्यक्रमाला अभय महाजन, दिनेष धोंगडे, दिपक काळे, उत्तम खंदो, अरूण पवा, संतोश भेंडे, शंकर माटे, माधव पारध, मधुकर कलींदर, विकास जामकर, गजानन कुबडे, गजानन पुलाते, अनिल चव्हाण, रवि बहादुरे, सुभाश बाबर, अवि बहादुरे, देवेंद्र कोहळे व शिवसैनिक उपस्थित हेाते.