Published On : Tue, Jul 21st, 2015

यवतमाळ : पुसद तालुक्यात बोगस डॉक्टर कार्यवाही

Advertisement


पुसद (यवतमाळ)।
ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करण्याची पात्रता नसतांना व वैद्यकीय परिषदेकडे कोणत्याही प्रकारची नोंदणी नसतांना वैद्यकीय व्यवसायिक व्यवसाय करतात. अशा बोगस डॉक्टररांनी उपचार केल्यामुळे रुग्णाच्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे अनेक रुग्णांना आपले अवयव गमवावे लागतात. तर कधी-कधी रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागतात. अशा वैद्यकीय व्यवसायीकावर कायदेशीर कार्यवाही होणे गरजेचे आहे. यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे कोणासही अपंगत्व येवू नये अथवा प्राण गमवावे लागू नये. यासाठी शासन निर्णया नुसार त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. असे आदेश मा. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंग यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनात मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड यांनी कार्यवाही करण्या संदर्भात लेखी आदेश पारित केले.

त्या अनुषंगाने डॉ. आशिष पवार तालुका आरोग्य अधिकारी यांनी पुसद तालुक्यातील बोगस डॉक्टरचा शेध घेवून कार्यवाही करण्याचे धडक मोहीम सुरु केली असून मौजे मुंगशी येथील अशाच एका बोगस व्यवसाय करणारे संतोष भिक्का जाधव यांना वैद्यकीय व्यवसाय करतांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांचेकडे मोठे प्रमाणात अॅलोपथीक औषधीचा साठा आढळुन आला, यामध्ये प्रामुख्याने गुगीचे व प्रसुतीच्या वेळी वापरण्यात येणारी औषध सामग्री आढळुन आली. सर्व साठा जब्त करण्यात आला. या दरम्यान वैद्यकीय व्यवसायीक यांना पळ काढला. त्या संबंधात ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही डॉ. आशिष पवार तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, रमेश आवटे, कृष्ठरोग तंत्रज्ञ सैजाद विराणींनी केली.

Representational Pic

Representational Pic

Advertisement
Advertisement

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above