Published On : Wed, Jan 8th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मत्स्यव्यवसाय वृद्धीसाठी मत्स्यशेतकरी आणि मच्छिमारांना मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

Advertisement

गोंदिया: मत्स्यव्यवसाय वृद्धीसाठी मत्स्यशेतकरी आणि मच्छिमारांना मार्गदर्शन करण्यासाठी तसचे ” नवी संधी आणि वाढीच्या उपायांवर मार्गदर्शन करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक ड्रीम सिलीब्रेशन सभागृह येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे आयोजन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, गोंदिया आणि जलजीविका संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

“ कार्यशाळेचा मुख्य उद्देश मत्स्यव्यवसायातील ताजी मासोळी हाताळणी, साठवण, वाहतूक व विपणन यामध्ये सुधारणा कशी करता येईल, तसेच विविध शासकीय योजना आणि वेगवेगळ्या व्यवसाय वृद्धीसाठी असणार्या योजना याविषयी श्री. कैलाश मारबते, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, गोंदिया, यांनी उपस्थित प्रशिक्षकांना मत्स्यव्यवसायाशी निगडीत विविध शासकीय योजना यांची माहिती दिली आणि यांना मार्गदर्शन केले श्री. अविनाश लाड, जिल्हा विकास प्रबंधक, नाबार्ड बँक यांनी रूरल मार्ट या योजनेविषयी माहिती दिली . जलजीविका संस्थेचे श्री समीर परवेज यांनी कार्यशाळीची प्रस्तावना मांडली तसचे मत्स्यव्यवसाय विपणन,मासोळीवर प्रशिक्षण इत्यादी संबधी उद्भवणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय सुचविण्याकरता या कार्यशाळेचा मुख्य उद्देश मांडन्यात आला. .

Gold Rate
Saturday18 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

“कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात सर्व उपस्थित मत्स्यव्यवसायातील सहभागिनी “आपल्या व्यवसायाची गोष्ट सांगा” या ग्रूप अॅक्टिविटी मध्ये सहभागी होऊन व्यवसाय सुरू करताना आलेल्या अडचणी तसेच व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणी यावर गट चर्चा केली. तसेच आपापसात चर्चा करून काय उपाय करता येतील हे सुचवले.जलजीविका संस्थेचे दामिनी अखंड, लखन माळी , रेमा तावडे आणि ब्रिजेश बैरवा यांनी सहभागीं सोबत मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनाचे विविध पैलू, आर्थिक समन्वय, आणि तांत्रिक उपाय यावर चर्चा केली.महत्त्वाचा क्षण म्हणजे “अक्वा ई-मित्र” या डिजिटल प्लॅटफॉर्मचे विषयी ब्रिजेश बैरवा यांनी मार्गदर्शन केले.

“सदर कार्यशाळेत एकूण ७४ मत्स्यव्यवसाय करणारे शेतकरी, व्यवसायिक अधिक सहभागी उपस्थित होते, ज्यामध्ये प्रधान मंत्री मत्स्यसंपदा योजनेचे वैयक्तिक लाभार्थी १०, ४ एफपीओचे संस्थेचे सदस्य ८ तसेच ३ एफएफपीओ संस्थेचे ११ प्रतिनिधी, 3 महिला बचत गटाचे १६, उवजीविका सलागार सदस्य ७ उपस्थित होते. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून लाभ मिळून मस्त्य व्यवसाय करणारे ९ सदस्य उपस्थित होते आणि ५ मत्स्य सहकारी संस्थांचे २० पदाधिकारी होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. कैलाश मारबते, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, गोंदिया, श्री कोमल नंदागवळी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी गोंदिया, श्री. सतिश मार्कंड, जिल्हा समन्वयक, महिला आर्धिक विकास महामंडळ अधिकारी, गोंदिया श्री. अविनाश लाड, जिल्हा विकास प्रबंधक, नाबार्ड गोंदिया उपस्थित होते. जलजीविका संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी नीलकंठ मिश्रा यांनी उपस्थित प्रशिक्षकांना डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे मत्स्यव्यवसाय विषयी मोलाचे संदेश दिला.

“कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात, उपस्थित लाभार्थ्यांनी व्यवसायातील अडचणी मांडल्या. मत्स्य बीजाची उपलब्धता, योग्य आहार व्यवस्थापन, आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक तांत्रिक सहयोग यावर सखोल चर्चा झाली. श्री जीवनसिंग चंदेल यांनी त्यांच्या एकात्मिक शेती कश्या प्रकारे यशस्वी केली याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. जलजीविका संस्थेने पुढील पायऱ्यांसाठी योजनांची आखणी करून त्यावर सहकार्याचे आश्वासन दिले. कार्यशाळेचा समारोप प्रमाणपत्र वितरण आणि सहभागींच्या उत्साही प्रतिसादासह करण्यात आला. या कार्यशाळेमुळे गोंदिया जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रात काम करणारे शेतकरी , व्यवसायिक, यांच्या व्यवसायात परिवर्तन घडवण्याची गरज निर्माण झाली आहे,असे निदर्शनास आले.

Advertisement