Published On : Fri, Dec 24th, 2021

स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर कार्यशाळा

Advertisement

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर यावर बुधवारी राणी हिराई सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली.

सर्व कचरा हानिकारक नसतो. कचऱ्याचे अनेक प्रकार असतात. कचऱ्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलायला हवा. कचरा ही समस्या म्हणून न पाहता त्याकडे एक संधी म्हणून पाहायला हवे, असेही सांगितले. तसेच कचरा विलगीकरण तसेच त्याचा पुनर्वापर आणि व्यवस्थापन प्रभावी पद्धतीने कसे करावे याची माहितीही उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना देण्यात आली. काच, धातू, प्लास्टिक, कागद, शाम्पू, बिस्किटे, गोळ्या, चॅाकलेट यांची वेष्टने पुनर्निमितीसाठी वापरता येतात, हे उदाहरणासह पटवून दिले.

यावेळी मोहित चुघ यांनी सहभागी नागरिक आणि विद्यार्थी यांना वापरलेल्या वस्तूंपासून पुननिर्मिती कराण्याविषयि विस्तृतपणे मार्गदर्शन केले. यावेळी दानिश पठाण यांनी माझी वसुंधरा अभियानातील विविध उपक्रमांची माहिती दिली, तर गिरीराज प्रसाद यांनी पुढील आठवड्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धा
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत चंद्रपूर शहरातील नागरिकांसाठी स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे . यात झिरो डम्प, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट, ट्रान्स्परन्सी (डिजिटल इनाब्लेमेन्ट ) आदी विषय यात आहेत. येत्या २९ डिसेंबर रोजीपर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येईल. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा ३ जानेवारी रोजी चांदा क्लब ग्राउंड येथे आयोजित “महापौर सखी महोत्सवा”त मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.