Published On : Fri, Mar 13th, 2020

पिपरी घाट बांधकामाची मिक्सर मशीन पडुन मजुर गंभीर जख्मी

कंत्राटदारांच्या निष्काळजीने व सुरक्षाच्या अभावाने अपघात.

कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत कंत्राटदारा कडुन पिपरी घाट बांधकाम सुरू असुन आज मिक्सर मशीन चार मजुरांना न सांभाळल्याने गडयात पडुन तुळशीराम कभे नामक मजुर गंभीर जख्मी झाला.

Advertisement

गुरूवार (दि.१२) दुपारी ३ वाजता पिपरी हनुमान मंदीर समोरील पिपरी नदी घाटाचे बांधकाम करित असताना चार मजुर मिक्सर मशीन गडयालगत लावत असताना कुठलेही दोर किवा जबरदस्त टेकु व कमी मजुर असल्याने तसेच सुपरवाईझर सुध्दा कामावर हजर नसल्याने मिक्सर मशीन उताराने गडया त पडली. सोबत तुळशीराम नथ्थुजी कभे वय ५० वर्ष मु पतीमाता मंदीर मागे खारी, पारशिवनी मशीन खाली दबुन गंभीर जख्मी झाल्याने उर्वरित तीन मजुरांनी आरडाओरड केल्याने काही लोकांनी जख्मी तुळशीराम ला बाहेर काढुन कामठी मार्गे नागपुर ला उपचारा करिता नेण्यात आले. जख्मीची परिस्थि ती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत पिपरी घाट बांधकाम कंत्राट सनराईज कॅनट्रक्शन कंपनीने अदाजे १४% कमी दरात कंत्राट घेऊन कन्हान येथील बबली खंडेलवाल हयाना पेटी कंत्राट मध्ये काम करित आहे. पिपरी नदी घाटाचे मागील डिसेंबर २०१९ पासुन बांधकाम सुरू आहे. सुरूवातीला १५ ते २० मजुर काम करित होते. मागील पंधरा दिवसापासुन स्थानीय मजुरांना बंद केले असल्याने येथे जोखीमेचे काम चार मजुर करित होते.

सुपरवाईझर तसेच कॅन्सलटींग कम्पनीची देखरेख नसल्याने ही दुदैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे. या बांधकामात नदीतील रेती वापरण्यात येत असल्याने चौकसी करावी. तसेच सुरक्षेचा अभाव व निष्काळजीने अपघा त झाल्याने बाहेरगावील गंरीब मजुराचा उपचार करून त्यास योग्य मोबदला देण्याची मागणी स्थानीय नागरिकांनी केली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisementss
Advertisement
Advertisement
Advertisement