Published On : Wed, Jun 8th, 2022
By Nagpur Today Nagpur News

महावितरणच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदिलाने काम करा

Advertisement

प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांचे आवाहन

महावितरणचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Gold Rate
Feb 27th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,600/-
Gold 22 KT ₹ 1,49,400/-
Silver/Kg ₹ 2,71,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे भक्कम पाठबळ,वरिष्ठ व्यस्थापनाची मोलाची साथ आणि तांत्रिक व अतांत्रिक कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळे महावितरण कंपनीने अडचणीच्या काळातही ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करून यशस्वी मार्गक्रमण करणे सुरु ठेवले आहे. आता या पुढील आव्हानांचा मुकाबला करून कंपनीचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर सर्वच कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या प्रगतीसाठी एकदिलाने काम करण्याची गरज असून कंपनीच्या भरभराटीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे,असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी केले.

वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळत राहावा म्हणून दिवस रात्र कर्तव्य बजावणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांना काही काळासाठी विरंगुळा मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)च्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त ६ जून २०२२ ला वसंतराव देशपांडे सभागृहात महावितरणच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी तर कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके होते.

महावितरचा कर्मचारी अत्यंत बिकट परिस्थितीत व जोखीमेचे काम करीत असतो. त्याची जाणीव ठेऊन या कर्मचाऱ्याला त्यांच्या कुटुंबीयांनी समजाऊन घेण्याची सर्वच प्रसंगात चांगली साथ देण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांनाही त्याच्या कुटुंबाला वेळा द्यावा,घरात विचारांचे आदानप्रदान करावे आणि स्वतःच्या आरोग्याची नेहमी काळजी घ्यावी. वीज विकणे व या विकलेल्या विजेचे पैसे वसूल करणे हे महावितरणचे मुख्य काम आहे.त्यामुळे ग्राहकाकडे थकबाकी राहणार नाही यादृष्टीने कायम कार्यतत्पर राहावे, असे आवाहन प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी या वेळी केले.

सर्वात मोठया क्षेत्रात वितरण करणारी महावितरण ही आशिया खंडातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. या कंपनीमुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सामाजिक प्रतिष्ठेसह केलेल्या कामाचा समाधानकारक मोबदलाही मिळतो. ७० हजार पेक्षा अधिक प्रशिक्षित मनुष्यबळ ही कंपनीची सर्वाधिक जमेची बाजू आहे. त्यामुळे महावितरण कंपनी समोर कोणतेही आव्हान आले तरी त्याचा यशस्वीपणे मुकाबला करण्याची ताकद महावितरणच्या या कर्मचाऱ्यांमध्ये आहे. परंतु कंपनीच्या भरभराटी साठी ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागून त्यांना जलद व सर्वोत्तम सेवा देणे आवश्यक आहे. तसेच आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी,नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले.

प्रसिद्ध वक्ते डॉ.संजय उपाध्ये लिखित व अभिनित मन करा रे प्रसन्न या मनोरंजनातम्क व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. दुःखाला कवटाळून न बसता जगण्यातील प्रसन्नता,आशावाद, विनोदीवृत्ती,खेळकरपणा अंगीकार करावा.तसेच समोरच्याला समजून घेण्याची वृत्ती आपल्या व्यक्तिमत्वात विकसित केल्यास चिडचिड होणे टळेल. याशिवाय सकारात्मक वृत्तीतून जगाकडे बघितल्यास आपल्या आसपास आनंदाने जगण्यासारखे बरेच काही याची जाणीव होईल व त्यातून तुमचे व तुमच्या परिवाराचे जगणे समृद्ध होईल असा मोलाचा सल्ला उपाध्ये यांनी यावेळी दिला.

या प्रसंगी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंते हरिष गजबे,अविनाश सहारे,अजय खोब्रागडे,अमित परांजपे,उप व्यवस्थापक (मा.तं) प्रमोद खुळे,उप महाव्यवस्थापक (मा.सं) रुपेश देशमुख यांनीही मार्गदर्शन केले.

वर्धापन दिनाच्या उदघाटन कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते वाय.डी.मेश्राम, नारायण लोखंडे, सुरक्षा व अंमलबजावणीचे उपसंचालक विजय चौरे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं) प्रदीप सातपुते,कार्यकारी अभियंते समीर शेंदरे, राजेंद्र गिरी,प्रफुल्ल लांडे,हेमराज ढोके,राजेश घाटोळे,दीपक अघाव,राहुल जीवतोडे,समीर टेकाडे,रुपेश टेम्भुरणे,दिपाली माडेलवार यांच्यासह अभियंते,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. सकाळच्या सत्रात विद्युत भवन येथील प्रादेशिक कार्यालयात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या शुभहस्ते हवेत फुगे सोडून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.सायकांळी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने उपस्थित कर्मचाऱ्यांनी आस्वाद घेतला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement