Published On : Sun, Aug 29th, 2021

रत्न बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिला मेळावा व समुपदेशन शिबिर

नागपूर: रत्न बहुउद्देशीय संस्थेतर्फे धरमपेठ झोन येथील सभागृृहात विधवा, परितक्त्या, पीडित व अन्यायग्रस्त तसेच कौटुंबिक कलहग्रस्त महिलांसाठी महिला मेळावा व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सरोज लोखंडे उपस्थित होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजसेवक शेखर गजभिये, संस्थाध्यक्ष सुधीर राऊत, सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा रंगारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सहभागी पीडित महिलांकडून त्यांच्यावर होत असलेला अन्याय-अत्याचार, महिलांच्या व्यथा, कौटुंबिक कलह, सासरकडून होत असलेला शारीरिक व मानसिक छळ याबाबत माहिती मान्यवरांनी जाणून घेतली. महिलांच्या समस्यांबाबत मान्यवरांनी योग्य समूपदेशन केले.

तसेच अशा पीडित महिलांना पीटा अ‍ॅक्ट, पोक्सो कायदा, बलात्कार पीडित महिलांकरिता मनोधैर्य योजना याबद्दल कायदेशीर माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे महिलांना बचावाकरिता कायद्याच्या विविध कलमांविषयी तसेच तरतुदींविषयी विस्तृृत माहिती सरोज लोखंडे व समाजसेवक शेखर गजभिये यांनी दिली. महिलांनी अशा बिकट परिस्थितीत खचून न जाता विविध लघुउद्योग, गृृहउद्योग या माध्यमातून रोजगार निर्मिती कशी करायची व स्वयंपूर्ण कसे व्हायचे याबाबत माहितीही मान्यवरांनी दिली. तसेच कार्यक्रमात महिला सक्षमिकरणावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रामाचा शेकडो महिलांनी लाभ घेतला. सूत्रसंचालन पल्लवी वासे यांनी तर आभार निशीकांत मानवटकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी स्वप्ना घोडेस्वार, पुनम राघासे, रंजना सुरजुसे, शशिकांत फुलझेले व संस्थेच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.