नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सत्ताकारणात महिलांचे नेतृत्व अधिक ठळकपणे पुढे आले आहे. महापौरपदी नीता ठाकरे यांची निवड झाल्याने शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, उपमहापौरपदाची जबाबदारी लीला हाथीबेड यांनी स्वीकारली आहे. या दुहेरी महिला नेतृत्वामुळे नागपूरच्या विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापौर नीता ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराचा सर्वांगीण विकास हेच प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. स्वच्छ नागपूर अभियानाला गती देणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे, नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे तसेच महिलांच्या सशक्तिकरणासाठी विशेष योजना राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नागपूर हे स्मार्ट आणि सुरक्षित शहर म्हणून विकसित करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महिला नेतृत्वाच्या या जोडीकडून नागपूरकरांना मोठ्या अपेक्षा आहेत. विकास, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि नागरिक सुविधांच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेच्या कारभारात सकारात्मक बदल घडतील, अशी भावना शहरातील विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





