Published On : Mon, Mar 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात जागतिक महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांचा गौरव

Advertisement

नागपूर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने टिळक पत्रकार भवन ट्रस्टच्या वतीने तसेच नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त सहकार्याने महिला पत्रकारांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम ८ मार्च रोजी सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबच्या सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक एस. एन. विनोद उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मनपा स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी वखरे यांनी हजेरी लावली.

पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या अंतर्गत भाग्यश्री शर्मा (लोकमत समाचार), अश्विनी म्हारोळकर-पाचखेडे (सकाळ), भाग्यश्री राऊत (बीबीसी) तसेच देवश्री भिमटे-मेश्राम (युसीएन) यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेला ‘स्त्री गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी हा सन्मान ज्येष्ठ समाजसेविका छाया खोब्रागडे यांना देण्यात आला. त्याचप्रमाणे ‘शोभा विनोद स्मृती पुरस्कार’ अंकिता देशकर (द इंडियन एक्सप्रेस) यांना प्रदान करण्यात आला.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याशिवाय पत्रकारपत्नी या विभागात पल्लवी केवल जीवनतारे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिला पत्रकारांचे योगदान अधोरेखित करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

Advertisement
Advertisement
nagpur student protest delhi lathi charge

nagpur student protest delhi lathi charge

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews  #CrimeNews  #LatestNews #news #Attack #newsupdate

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews  #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews #newsupdate

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug #NDPS #Crime #latestnews #news

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime  #CCTV #LatestNews #newsupdate

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges