
कन्हान: वरून मांगली ला लग्नाच्या स्वागत समारंभास जात असताना निलज जवळ मिनी बसने एका महिलेला धडक दिल्याने दिपीका बागडे गंभीर जखमी झाली असून ऑरेंज सिटी नागपुर ला खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे .
गणेश नगर कन्हान येथील रहिवासी सचिन मधुकर बागडे वय २८ वर्ष हे आपल्या पत्नी सह होंडा साईन दुचाकी क्र एम एच ४० – ए बी ३०३० ने मांगली येथे नातेवाईक मेश्राम यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभा करिता तारसा रोड ने सोमवार (दि.२२) ला सायंकाळी जात असताना निलज (खंडाळा) जवळ रस्ता लगत गड्यात दुचाकी स्लीप होऊन खाली पडले व उठुन उभे झाले असता मागुन येणा-या मिनी बस क्र एम एच ४० – वाय ६८१७ च्या चालकांने आपले वाहन वेगाने व निष्काळजीने चालवुन रात्री ८.१५ वाजता दरम्यान दिपीका सचिन बागडे वय २८ वर्ष हिला जोरदार धडक मारली. त्या खाली पडुन कमरे वरून मिनी बसचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्याना कामठी येथील खाजगी दवाखान्यात नेले असता प्रकृती अत्यंत नाजुक असल्याने नागपुर येथील ऑरेंज सिटी दवाखान्यात उपचा रार्थ दाखल करण्यात आले. मंगळवार (दि. २३) ला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून आय सी यु मध्ये उपचार सुरू आहे. कन्हान पोलीस स्टेशनला आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
धर्मांतरण के दबाव और शोषण का आरोप, सोनेगांव थाने में केस दर्ज.....
स्मार्ट मीटर पर शिवसेना-मनसे आमने-सामने.. #maharashtranews #smartmeter #latestnews
आशा वर्कर्स के सामूहिक इस्तीफे से संकट.. #maharashtranews #ashaworkers #latestnews
गोंदिया में 123 इमारतें बनीं खतरा.. #maharashtranews #gondiya #newsupdate
सपकाळ का भाजपा और केंद्र पर हमला.. #maharashtranews #congressvsbjp #politicsnews #latestnews
श्रीनगर में तिरंगा न होने पर नेहरु जिम्मेदार बोंडे.. #maharashtranews #anilbonde #amravati







