Published On : Sun, Mar 7th, 2021

जागतिक महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांचा गौरव सोहळा

नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व प्रेस क्लब आॅफ नागपूरच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त दि. ८ मार्च रोजी दुपारी ३ वाजता, प्रेस क्लब येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये महिला पत्रकारांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुश्री रुबी श्रीवास्तव, प्रधान प्रमुख आयकर आयुक्त उपस्थित राहणार आहेत. सिनेजगतातील ज्येष्ठ कलावंत, माजी केंद्रीय मंत्री श्री. शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येतील. यावेळी देशबंधू या वृत्तपत्राचे प्रमुख संपादक श्री. सर्वमित्रा सृजन हेही विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात, श्रीमती शोभा विनोद स्मृती वूमन जर्नलिस्ट आॅफ द इयर हा पुरस्कार एबीपी माझा च्या विदर्भ संपादक सुश्री सरिता कौशिक यांना प्रदान केला जाईल. नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व प्रेस क्लब आॅफ नागपूरच्या वतीने देण्यात येणारा स्त्री गौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती उषा मिश्रा यांना प्रदान केला जाणार आहे. पत्रकारितेच्या जगात आपले स्थान निर्माण करणाºया, मेघना देशपांडे (हितवाद), कल्पना नळस्कर (लोकशाही न्यूज), मीनाक्षी हेडाऊ (युसीएन) आणि डॉ. सीमा अतुल पांडे यांना या कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहे.

कार्यक्रमाचे स्थळ- प्रेस क्लब आॅफ नागपूर, सिव्हील लाईन्स.
वेळ- दुपारी ३ वा.
दि. ८ मार्च २०२१.