Published On : Mon, Jul 13th, 2020

सात दिवसाच्या बाळाला जन्म दिलीली महिला कोरोना पोझिटीव….

Advertisement

रामटेक तालुक्यात कोरोनाचा मंदगतीने विस्तार।
प्रशासनासाहित आरोग्य विभागाची करडी नजर।

सात दिवसाच्या बाळाला जन्म दिलीली महिला कोरोना पोझिटीव….
नगरधन हिवरा बाजार रामटेक मनसर आणि आता बोर्डा येथे निघाली एक कोरोना संक्रमीत महिला रुग्ण…
रामटेक.

रामटेक तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना मंदगतीने आपला विस्तार करीत असून नगरधन, हिवराबाजार, रामटेक, मनसर, आणि आता बोर्डा गावातही 22 वर्षीय महिला कोरोणा रुग्ण आढळली आहे.

मनसर प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्वास्थ अधिकारी डॉक्टर विवेक अनंतवार यांच्या माहितीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे महिलेने एका मुलाला जन्म दिला आणि आणि जन्मतावेळी त्या मुलाचा वजन कमी असल्यामुळे 5 जुलैला डागा हॉस्पिटल नागपूर येथे नागपूर येथे रेफर केलं होतं
त्यानंतर त्या महिलेची तिथे कोरोणाची टेस्ट करण्यात आली व ती रिपोर्ट पॉझिटिव्ह आली. सदर माहितीनुसार महिलेला मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे उपचार सुरू आहे.

महिलेचा पती आणि मुलाची रिपोर्ट यायची असून. त्यांना नागपूरलाच क्वारांटेन केले आहे.
बोर्डा येथील महिलेच्या कुटुंबातील व शेजारच्या 10 सदस्यांची टेस्ट करण्यात आली आहे व त्यांचे रिपोर्ट यायचे असून त्यांना जी प शाळा बोरडा येथे क्वारांटन केले आहे असे स्वास्थ अधिकारी डॉक्टर विवेक अनंतवार यानि सांगीतले प्रशासनाला ही माहिती मिळताच आरोग्य विभागाने महिलेच्या घरी योग्य ती कारवाई केली.

सात दिवसाच्या बाळाला जन्म दिलीली महिला कोरोना पोझिटीव आल्याने बोरडा गावात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मनसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्वास्थ अधिकारी डॉक्टर विवेक अनंतवार , आरोग्य सेवक, पेंडसे, गवारे, बुपळे, सुपर वाइझर खंते , शिकरे यांनी सर्व बाबीवर बोर्डा ह्या गावी जाऊन माहिती घेणे सुरु आहे.

तेथिल काही परिसर सील केला असुन येणाऱ्या परिस्थितीवर तालुका वैदकिय अधिकारी चेतन नाईकवार, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, ठेवून आहेत.