नागपूर : लाईट ऑफ होप फाऊंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिना निमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सत्कार करण्यात आला. शहराच्या प्रथम नागरीक, महापौर सौ. नंदाताई जीचकार, मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी आशाताई पठाण, वरीष्ठ पत्रकार ज्योतीताई तिरपुडे व नागपूर शहर पोलिस, विशेष शाखेच्या उपायुक्त स्मर्थना पाटिल यांना मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रामुख्याने अक्षय पाटील, प्रसाद मुजुमदार, चिन्मय खानझोडे, कौस्तुभ आवळे, आरती पांडे, कल्याणी मुळे, अक्षय कोकाटे, सागर तिवारी, कार्तिक आवळे, गौरी आवळे, आसावरी देशमुख, स्नेहा तिवारी, आदित्य वाडेकर, देवीन, शुभम कोठेकर, अनित रोकडे, पद्मज पाटिल, कृपा जुगादे, अंकिता कोळी, श्रीया ठाकरे, शिवानी कार्णिक व इतर सभासदर उपस्थित होते.
            Published On            : 
            Thu, Mar 8th, 2018             
          
		  	
            By            Nagpur Today 
                      
        जागतिक महिलादिनानिमित्त लाईट ऑफ होप फाऊंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा सत्कार
Advertisement
 

 
			












 
			 
			
