Published On : Sat, Dec 9th, 2017

शासनाच्या कोणतीही मदत न घेता वसुंधरा अनाथ मुलींचे वस्तीगृह कार्य अभिनंदणीय – सुकेशनी तेलगोटे

Advertisement


नागपूर: वसुंधरा ‍चॅरिटेबल सोसायटी मागच्या पाच वर्षापासून अनाथ व आर्थिक बाजूने कमकुवत अशा मुलींना जोपासण्याचे कार्य करीत आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ हे ‍ उदिष्ट ठेवून मागच्या पाच वर्षाची वाटचाल या संस्थेने पूर्ण केली. शासनाच्या कोणतेही मदत न घेता त्याचे सामाजिक दृष्टीकोणातून निस्वार्थ सेवा गौरवास्पद असल्याचे मनोगत जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी श्रीमती सुकेशनी तेलगोटे यांनी व्यक्त केले. वसूंधरा चेरिटेबल ट्रस्टचे कल्याणकारी कार्याची माहीती असलेले हेच औचित्य साधून पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन आमदार डॉ. मिलिंद माने यांचा हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, ललित कला भवन, चाँक्स कॉलोनी, इंदोरा येथे थाटात संपन्न झाले. प्रमुख अतिथी आ.डॉ.मिलींद माने यांनी व्दीप प्रज्वलन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे हया होत्या. पूर्व सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग श्री. जी.डी. जांभूळकर, अध्यक्ष स्थायी समिती मनपा श्री. संदीप जाधव, जनसंपर्क अधिकारी मनपा श्री. अशोक कोल्हटकर, बसपा नगरसेवक श्जितेंद्र घोडेस्वार, रुपक जांभूळकर, नगरसेवक प्रमोद तभाने, नगरसेविका विरंका भीवगडे, वसूंधरा चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा हर्षा पाटील, सचिन रामटेके, लताताई येरखेडे, डॉ. मीनू सबराल, सपना तनेजा, मनिषा काशीकर ॲङ. हर्षवर्धन मेश्राम, यांची यावेळी ‍ अतिथी म्हणून प्रमुख उपस्थिती होती.

उत्तर नागपूर चे आमदार डॉ.मिलींद माने म्हणाले वसूंधरा चॅरिटेबल ट्रस्ट समर्पीत गरीब व होतकरु व निराधार मुलींच्या उत्कर्षासाठी सामाजिक जाणीव घेवून निस्वार्थीपणे काम करीत असल्याचे उल्लेख करुन संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याचा संकल्प व्यक्त केला.

स्थायी समिती सभापती संदीप जाधव म्हणाले, डॉ.बाबासाहेब, महात्मा फुले यांच्या आदर्श समोर ठेवून सेवाभावी कार्य करीत आहे, नागपूर व ना.सु.प्र. तर्फे प्रास्ताव दिल्यास त्याचा आवश्यक विचार करु, असे मनोगत व्यक्त केले. यावेळी नागपूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधीकारी अशोक कोल्हटकर व पमिता कोल्हटकर यांनी भारतीय संवीधान उध्दशीकेची सोनेरी अक्षरात नोंद असलेली उध्देशीकेची आकर्षक फोटो फ्रेम संस्थेला भेट दिली.

प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा हर्षा पाटील यांनी केले. सचिन रामटेके यांनी संस्थेची भूमिका मांडली. सुत्रसंचालन विशाखा मेश्राम व प्रशांत बासोडे यांनी केले तर आभार माधूरी रामटेके यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत स्मीता हाडके, माधुरी रामटेके, मंजूशा गोटेकर, वैशाली कांबळे, शोभणा ‍पील्लेवान यांनी केले. सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्यकरणा-या सम्यकवाणीचे संपादक अशोककुमार धमगाये, ‍ दि विदर्भ प्रिमियर को – ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे सभासद प्रभाकर तभाने, दानपारामिता संस्थेचे कोषाध्यक्ष प्रविण राजवैदय यांचा यावेळी मान्यवरांचा हस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर वसुंधरा चॅरीटेबल सोसायटीच्या मुली, लिटील स्कॉलर स्कूलचे विदयार्थी, आदर्श कन्या शाळा, नागसेन स्कूल, राष्ट्रसेवा विदयालय, सरस्वती विदयालय, वैशाली वसतीगृह इत्यादी विदयार्थांचा संगीतमय कार्यक्रम झाला. तथापि अरुणाचल प्रदेशच्या मुलींनी चकमा हे नृत्य सादर करुन श्रोत्यांचे मन भारावून टाकले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता ‍ स्मिता हाडके, मंजूशा गोटेकर, वैशाली कांबळे, शोभना पिल्लेवान, माधूरी रंगारी, अंजू धारगावे, प्रज्ञा माटे, राजेश हाडके, मनिष पाटील, पमिता कोल्हटकर, ज्योती शंभरकर, संगीता रामटेके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.