Published On : Wed, Aug 18th, 2021

सभापती सोनकुसरे यांच्या प्रयत्नाने प्रभाग 34 मधील पाणी समस्या मार्गी

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची वाट बघणाऱ्या प्रभाग क्र. ३४ मधील वस्त्यांची पाणी समस्या मार्गी लागली आहे. प्रभाग ३४ ब चे नगरसेवक तथा स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी अवधूत नगर, शेष नगर, जबलपुरे लेआऊट या परिसराचा दौरा करून उर्वरित कामे तातडीने करण्याचे निर्देश दिले.

सभापती राजेंद्र सोनकुसरे यांच्या प्रयत्नाने शेष नगर, जबलपुरे लेआऊट या भागात नळ लाईन टाकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि काम पूर्णत्वाकडे गेले. दोन लाईनचे काम शिल्लक असून यासाठी मंगळवारी (१७ ऑगस्ट) रोजी सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी संबंधित भागाचा दौरा केला. जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई या दौऱ्यात सहभागी झाले होते. प्रस्तावित आणि मंजूर कामानुसार संपूर्ण कार्य तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश सभापती संदीप गवई यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Advertisement

यावेळी हनुमान नगर झोनचे जलप्रदाय विभागाचे अधिकारी डेलिगेट, इंजिनीयर, ओसीडब्ल्यूचे अधिकारी व कंत्राटदार, परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अवधूत नगर, शेष नगर, जबलपुरे लेआऊट येथील पाणी समस्येवर तोडगा काढल्याबद्दल दोन्ही सभापतींचे आभार मानले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement