Published On : Fri, Jun 26th, 2020

पोलिसांच्या आशीर्वादाने कामठीत गांजा विक्री जोमात

बस स्थानक चौक बनले गांजा तस्करी केंद्र

कामठी – नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहराची 1990 -92 मध्ये झालेल्या जातीय दंगलामुळे महाराष्टाच्या गॅझेट मध्ये राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे अतिसंवेदनशील शहर म्हणून नोंद कारण्यात आली आहे तेव्हा कामठी शहरात गुन्हेगारीवर अंकुश लादून कायद्याचे राज्य निर्माण व्हावे या मुख्य उद्देशातून मुख्यमंत्री देवेंद्र फडंणविस यांच्या शुभ हस्ते कामठी पोलीस स्टेशन नागपूर परिमंडळच्या पाचव्या झोन मध्ये निर्माण करीत शहर पोलीस आयुक्तालयात समावेश करीत मोठया गाजवाजाने 2014 मध्ये शुभारंभ करण्यात आला असला तरी गुन्हेगारीचा ग्राफ पाहिजे तेवढा कमी झालेला दिसत नाही.

कामठी शहरात आजही अवैध धंदे चोरीचुप्या पद्धतीने बेभान सुरु असून अमली पदार्थाची बिनभोबाटपणे तस्करी सुरु आहे तर मागील आठवड्यात नागपूरच्या गुन्हे शाखा पोलिसांच्या अटकेत आलेला कोकेंनतस्करकडून कामठी हे कोकेन व गर्द चे मोठे तस्कर आहे तसेच पोलिसांच्या आशीर्वादाने कामठी शहरात गांजा व अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून बिनधास्त पणे गांजा विक्री सुरू आहे तर कामठी बस स्थानक चौक गांजा व अंमली पदार्थाची तस्करी केंद्र बनले असून पोलिसांना मिळत असलेल्या चिरी मिरी मुळे या गांजा व्यवसायिकांना पोलिसांचा अभयपणा झाला आहे

Gold Rate
June 01- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 156,200 /-
Gold 22 KT ₹ 1,44,900 /-
Silver/Kg ₹ 2,62,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सद्रक्षणाय खालनिग्रहनाय हे ब्रीद बाळगून जनसामान्यण्यासाठी सदैव तत्पर असणारे पोलिसावर शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची मुख्य जवाबदारी असते.मात्र काही भ्रष्ट पोलिसांमुळे या कर्तव्यदक्ष भूमिकेला गालबोट लागत असून शहरात काही प्रमाणात अवैध व्यावसायिकांचे जाळे पसरले आहे या शहरातील मुख्य औचित्यचा मुद्दा असलेला कामठीचा कत्तलखाना बंद करण्यात यशप्राप्त झाले असले तरीही गुप्तचरपद्धतीने व्यसवसाय सुरु आहेच ज्याची परिणीती पोलिसांकडून होत असलेली कारवाही देते.

कामठी शहरात गांजा ची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून जागोजागी गांजा विक्री सुरू असून भरचौकात व बसस्थानक वा इतर ठिकाणी गांजा मद्यपी आढळून येतात पोलिसांच्या अशीर्वादामुळेच शहरात गांजा,चरस तसेच अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून यांना पोलिसांचा अभयपणा तयार झाला आहे तसेच कामठी शहरात कोकेंनतस्करासह गांजा व चरसविक्रीचे मोठे केंद्र असून याकडे पोलिसांनी अतिरिक्त कमाईकडे दुर्लक्ष पुरवून या अवैध धंद्यावर अंकुश लावावे अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे

संदीप कांबळे कामठी

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges