Published On : Mon, Dec 31st, 2018

धावणार माझी मेट्रो’ विश वॉल वर पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी,महानगरपालिका आयुक्त यांनी दिल्या शुभेच्छा

Advertisement

>नागपूरकरांसाठी फायद्याची ठरणार नागपूर मेट्रो : डॉ. भूषण कुमार उपाध्याय

नागपूर : महा मेट्रो नागपूर प्रकल्प शहरासाठी अत्यंत महत्वाची आणि फायद्याची ठरणार आहे. भविष्याची खरी योजना नागपूर मेट्रोच्या माध्यमातून शहरात होत आहे. प्रकल्पाचे कार्य पूर्ण होताच किमान पुढच्या २५ वर्षासाठी नागपूरकरांना त्याचा फायदा होणार आहे. यासह शहरातील इतर विकास कामाची जवाबदारी देखील महा मेट्रो निष्ठेने पार पडत आहे. अश्या शब्दात शहराचे पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय महा मेट्रो नागपूर प्रकल्पाचे कौतुक केले.

नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. अश्विन मुद्गल यांनी शहरात महा मेट्रो नागपूर प्रकल्पाचे निर्माण कार्य होत असल्याने ही आपल्या शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. ग्रिनेस्ट मेट्रो म्हणून आज नागपूर मेट्रोची ओळख निर्माण होत चालली आहे. नागपूर मेट्रोच्या यशस्वी कार्याबद्दल आणि प्रकल्पाच्या पुढच्या प्रवासाबद्दल त्यांनी महा मेट्रो नागपूरला हार्दिक शुभेच्छा दिल्या.

नागपूर मेट्रोच्या यशस्वी वाटचालीसाठी नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त श्री. अभिजित बांगर यांनी शुभेच्छा दिल्या. मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत त्यांनी प्रकल्पाच्या कार्यबद्दल गौरवोद्गार काढले. सध्या महा मेट्रो नागपूरतर्फे सुरु असलेल्या ‘धावणार माझी मेट्रो’ विश वॉल कॅम्पेन अंतगर्त महत्वाच्या पदावर कार्यरत अधिकाऱ्यांनी महा मेट्रो नागपूर प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.