Published On : Wed, Nov 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन; तयारीला वेग, १५० कामांच्या निविदा रखडल्या

Advertisement

नागपुरात ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन; तयारीला वेग, १५० कामांच्या निविदा रखडल्या

नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार असून, प्रशासनाकडून तयारीला वेग देण्यात आला आहे. अधिवेशनासाठी मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी २५ नोव्हेंबरपासून नागपुरात दाखल होणार आहेत. त्यामुळे त्याआधी सरकारी कार्यालये आणि निवासस्थानांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने एकूण ३८६ कामांचे नियोजन केले आहे. यामध्ये २२९ सरकारी कार्यालये आणि १५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांमधील कामांचा समावेश आहे. दुरुस्ती, रंगरंगोटी, वीज, पाणी आणि स्वच्छतेची कामे २७ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, यातील सुमारे १५० कामांच्या निविदा अद्याप खुल्या झालेल्या नाहीत. अनेक कामांसाठी कंत्राटदार मिळालेले नसून काहींचे कार्यादेशही प्रलंबित आहेत. निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने कामांच्या गतीवर परिणाम होत आहे. दुसरीकडे, सर्व महत्त्वाची कामे सुरू असून उर्वरित कामेही निर्धारित वेळेत पूर्ण केली जातील, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी प्रशासन ही सर्व कामे पूर्ण करू शकणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.