Published On : Mon, Mar 19th, 2018

महिलांच्या प्रश्नांबाबत सदैव जागरुक राहून कार्य करणार : प्रगती पाटील

Advertisement


नागपूर: महिलांच्या प्रश्नांबाबत सदैव जागरुक राहून कार्य करणार आणि त्यांच्या कायमस्वरूपी रोजगारासाठी सदैव प्रयत्नरत राहणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांनी केले.

मनपाच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अविरोध निवड झाल्यानंतर आयोजित पदग्रहण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी आमदार मोहन मते, मनपातील उपनेत्या वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, दुर्बल घटक समिती सभापती महेंद्र धनविजय, अजय पाटील, नगरसेविका वंदना भगत, स्नेहल बिहारे, मंगला खेकरे, वंदना यंगटवार, भारती बुंडे, स्वाती आखतकर, उषा पॅलट, रूपा राय, उज्ज्वला शर्मा, विद्या कन्हेरे, नेहा वाघमारे, नगरसेवक अमर बागडे, प्रकाश भोयर, सुनील हिरणवार, प्रदीप पोहाणे यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रगती पाटील म्हणाल्या, महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी समितीच्या माध्यमातून सदैव प्रयत्नरत असेन. रस्त्यावर फिरणाऱ्या गरीब मुलांसाठी पोलिस विभागाशी समन्वय साधून कार्य करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


यावेळी महापौरांनी नवनिर्वाचित महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, श्रीमती प्रगती पाटील ह्या अनुभवी नगरसेविका आहेत. त्यांच्या अनुभवाचा वापर करीत त्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून उत्तम कार्य करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.