Published On : Mon, Feb 12th, 2024

काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर धुसफूस,भाजप पक्ष सर्वांसाठी खुला; चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

नागपूर : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीमाना दिला. चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. मी यापूर्वीच सांगितले आहे की, काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर धुसफूस आहे. त्यांच्यात अनेक अंतर्गत वाद आहेत.

Advertisement

तसेच नेत्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याची केंद्रीय नेतृत्वात क्षमता नाही. त्यामुळं अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असेल तर त्याचे कारण काय, हे तपासले पाहीजे. पण काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.

अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढणार का ? या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, पक्षप्रवेश बुथस्तरावरचा असो किंवा राज्यपातळीवरचा त्याचा निश्चितच फायदा होत असतो. तसेच चव्हाण यांचा जर प्रवेश झाला तर आम्हाला आनंदच होईल. काँग्रेसमधील अनेक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी तयार आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांनी तर निर्णय घेतला आहेच. इतरही नेते लवकरच काँग्रेसची साथ सोडतील, असे बावनकुळे म्हणाले.