Published On : Sat, Oct 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी नागपूरच्या दीक्षाभूमीचीच का केली निवड?

Advertisement

नागपूर: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांनी कोणताही गोंधळ कोणताही वाद न करता मोठी धम्म क्रांती घडवून आणली. दीक्षाभूमीवर आज शनिवारी (दि.12) 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा होत आहे. देशभरातून लाखो अनुयायी नागपुरात दाखल झाले आहेत.

बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी नागपूरची निवड का केली? यामागचे नेमकं कारण काय आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? हिंदू धर्मात दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर लढा दिला. त्यामुळेच त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 मध्ये येवला येथे धर्मांतराची घोषणा केली.

Gold Rate
31 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,34,100/-
Gold 22 KT ₹ 1,24,700 /-
Silver/Kg ₹ 2,38,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

“मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,” असे उद्गार त्यांनी काढले होते. त्यानंतर विविध धर्मांचा अभ्यास करून त्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 1956 पर्यंत धर्मांतर कधी व कुठे होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती.

नागपूर नव्हे तर ‘या’ ठिकाणाला होती पसंती –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ठिकाणासाठी विविध नावं पुढे आली. विशेष म्हणजे यामध्ये सुरुवातील नागपूर नव्हतेच. तर वाराणसी येथील सारनथ हे ठिकाण सुरुवातीला चर्चेत होते. याच ठिकाणी गौतम बुद्धांनी पहिला उपदेश केला आणि भिक्षूसंघ स्थापन केला. त्यामुळे या हे ठिकाण अनेकांनी सुचविले होते. त्यानंतर अनेक पर्याय पुढे आले.

शेवटी मंबई हे ठिकाण निश्चित होत आले होते. बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी मुंबई या ठिकाणाला सर्वाधिक पसंती होती. परंतु, धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी नागपूरचे नाव सुचविले तसेच त्यामागचा उद्देशही स्पष्ट केला. गोडबोले यांच्या आग्रहामुळे पुढे नागपूर हे ठिकाण निश्चित झाले. विशेष म्हणजे धम्मचक्र परिवर्तनाच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी गोडबोले यांनी स्वीकारली. तसेच नागपुरातील तत्कालीन बौध्दजण समितीने या सोहळ्याचा संपूर्ण खर्च आणि जवाबदारी घेतली. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर हेच ठिकाण बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी सुनिश्चित केले. पूर्वी नागपूर ही नागवंशीयांची राजधानी होती. नागवंशीय लोक हे पूर्वाश्रमीचे बौद्ध मानले जातात. त्यामुळे नागपुरात धम्मदीक्षा समारंभ झाल्यास मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील, असे गोडबोले यांचे मत होते. तसेच नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असल्याने दळणवळणाच्या दृष्टीनेही सोयीचे ठिकाण होते.

लाखो अनुयायांसह बाबासाहेब यांनी सिवकरला बौद्ध धर्म –
14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरातील अंबाझरी रोडवर दीक्षाभूमी येथे भव्य मंडप घालण्यात आला. सकाळी 9.30 च्या सुमारास बाबासाहेब व माईसाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धम्म दीक्षा विधी पूज्य भन्ते चंद्रमणी महास्थवीर यांनी केला. पुनः त्याच मंडपात खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे 5 लाखापेक्षा अधिक बांधवाना 22 धम्म प्रतिज्ञा देऊन स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement