Published On : Wed, Sep 27th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर कोणी बुडवले? ठाकरे गटाचा सामना आग्रेलखातून संतप्त सवाल

Advertisement

नागपूर : दोन दिवसांपूर्वी नागपुर शहराला मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले होते. पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. यामुळेच तलावाचे पाणी लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये शिरले.

यावरुन आता राजकीय वर्तुळातही आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई तुंबली म्हणून शिवसेनेकडे बोट दाखविणाऱ्यांचे आता नागपूरचे ‘तुंबापूर’ झाले यावर काय म्हणणे आहे? नागपूर कोणी बुडवले? असा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत. त्याचे आधी उत्तर द्या आणि मगच नागपूरच्या विकासाच्या वल्गना करा, अग्रलेखातून अशा शब्दात टीका करण्यात आली आहे.

ज्या नाग नदीतून बोटी चालविण्याचे स्वप्न तुम्ही दाखविले त्याच नाग नदीत हजारो कुटुंबांची घरेदारे, संसार, गाडय़ा वाहून जाताना पाहण्याची वेळ नागपूरकरांवर का आली? त्यासाठी कोणाकडे बोट दाखवायचे? याच नाग नदीच्या महापुरात तुमच्या तथाकथित विकासाचा आज चिखल झाला आहे आणि त्या चिखलात सामान्य नागपूरकर आपले किडुकमिडुक शोधत वणवण फिरत आहेत. त्याचे काय प्रायश्चित्त तुम्ही घेणार आहात? असा प्रश्नही अग्रलेखातून भाजप सरकारला विचारण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.