Advertisement
नागपूर :अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले.
इतकी वर्षे कुठे झोपला होतात? असा सवाल त्यांनी श्याम मानव यांना केला आहे.
श्याम मानव यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत. यासोबतच अशा लोकांची नार्को टेस्ट व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
इतकेच नाही तर मुनगंटीवार यांनी राज्यातील घसरत चाललेली राजकीय पातळी आणि भाषणबाजीविरोधात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कायद्यात बदल करण्याची मागणी केली.