Published On : Mon, Dec 16th, 2019

वराडा बंद टोल नाका बांधकाम कधी काढणार.

Advertisement

बंद टोल नाक्यामुळे अपघात होऊन निष्पाप जिवाचा बळी.

कन्हान : – अनेक निष्पाप जीवांचा बळी घेऊनही ओरिएंटल कन्स्ट्रक्शन कंपनी चा वराडा फाट्या जवळील बंद पथकर नाका प्रशासनाच्या अनास्थेमुळे दिमाखात ताठ मानेने उभा आहे. आठ वर्षे झाली तरी हा बंद पथकर नाक्याचे बांधकाम काढण्यात आले नाही. या टोल नाक्यावर आणखी किती बळी घेतल्या नंतर हा टोल नाका हटविणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणा च्या वतीने ओरिएंटल कन्स्ट्रक्शन कंपनी ने सुमारे दहा वर्षांपुर्वी नागपूर जबलपूर महामार्गाचे चौपदरीकरण करून २०१२ ला खापरी, डोंगरगाव, कन्हान, वराडा फाट्यावर टोल नाके सुरु केले. पण डोंगरगाव व वराडा टोल नाक्याचा प्रचंड विरोध झाल्याने ही नाके बंद करून अनुक्रमे बोरखेडी व मनसर ला सुरू करण्यात आले. पण बंद केलेल्या टोल नाक्याचे बांधकाम जसे च्या तसे ठेवले. काही वर्षांपुर्वी डोंगरगावचा टोल नाका हटविण्यात आला. पण वराडा फाट्या जवळील बंद पथकर नाका आठ वर्षे लोटूनही हटविण्यात आला नाही. या बंद पथकर नाक्यावर महामार्ग पोलिसांनी आपली चौकी लावून वाहने तपासणीच्या नावाखाली अवैध वसुली करण्याचे काम

नित्यनेमाने करीत आहेत. पोलिसांच्या जाचक त्रासा‌पासून सुटका करून घेण्या साठी वाहन चालक आपली वाहने भर धाव वेगाने चालवितात तेव्हा अनियंत्रित झालेल्या वाहनाचे अपघात होतात.आता पर्यंत या बंद टोल नाक्यावर डजनावर अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहे .रोज वाहन तपासणी करून ही महामार्ग पोलिसांनी गेल्या काही वर्षांत फार मोठी कारवाई केल्याचे दिसुन येत नाही. मॅग्नीज, रेती चोरी, कोळसा चोरी, अवैध जनावरांची वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक, नकली दारुची वाहतूक याच मार्गाने मोठया प्रमाणात होत असते.

या बंद टोल नाक्याचा खरा फायदा महामार्ग पोलीसांच्या पथ्यावर पडला आहे. टोल नाक्याचा आडोसा घेऊन वसूली ला प्राधान्य देण्याऱ्या पोलिसांच्या चौकी जवळ गोंडेंगावच्या एका अवैध कोळसा टाल व्यावसायिकांची हत्या करण्यात आली होती. पण त्यावेळी त्यांनी काना वर हात ठेवले होते. महामार्गावर अपघा त होतात तेव्हा माहामार्ग पोलीस स्थानि क पोलीसाच्या नंतर उशिरा घटना स्थळी पोहतात. अशी नागरिकांची नेहमी ओरड असते. ओरिएंटल कन्स्ट्रक्शन कंपनी चा वराडा फाट्या जवळील बंद पथकर नाका प्रशासनाच्या अनास्थेमुळे दिमाखात ताठ मानेने उभा आहे. आठ वर्षे होऊन सुध्दा हा बंद पथकर नाक्याचे बांधकाम काढण्यात आले नसल्याने येथे होणा-या अपघातात निष्पाप जिवाचा बळी जातो यामुळे बंद पथकर नाक्याचे बांधकाम त्वरित काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.