Published On : Mon, Apr 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

देवेंद्रजींनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर ‘१०० कोटी वसुली फाईल्स‘ची स्क्रिप्ट तयार

Advertisement

देवेंद्र फडणवीसांवरील टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं चोख प्रत्युत्तर

‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे दिल्लीत-बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळेंकडून ‘वाझे की लादेन फाईल्स‘, ‘खिचडी फाईल्स‘, ‘कोविड बॅग फाईल्स‘ चाही उल्लेख

उद्धव ठाकरे यांचा टोमणेसम्राट उल्लेख करत बावनकुळेंकडून खोचक टीका

Advertisement

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून काय प्रत्युत्तर दिलंय पाहुयात

मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला.

देवेंद्रजींनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर ‘१०० कोटी वसुली फाईल्स‘ची स्क्रिप्ट तयार आहे. त्याची काळजी उद्धव ठाकरेंनी करू नये. याशिवाय ‘वाझे की लादेन फाईल्स‘, ‘खिचडी फाईल्स‘, ‘कोविड बॅग फाईल्स‘ असे अनेक चित्रपट काढता येतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या अडीच वर्षाच्या कारभाराचा विचार करावा.

बाकी तुम्ही देवेंद्रजींना कितीही टोमणे मारले तरी महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.