Published On : Tue, May 14th, 2019

WhatsApp Calling द्वारे इंस्टॉल होत आहे Spyware; खाजगी माहिती चोरी होऊ नये म्हणून कंपनीकडून App अपडेट करण्याचे आवाहन

Advertisement

WhatsApp युजर्ससाठी एक मोठी बातमी आहे. व्हॉट्सअॅपच्या कॉलिंग फिचरमध्ये एक बग डिटेक्ट झाला असून त्याद्वारे तुमची वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते. त्यामुळेच कंपनीने युजर्सला व्हॉट्सअॅप मोबाईल मेसेजिंग अॅप अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.

व्हॉट्सअॅपमध्ये व्हॉईस कॉलिंग करताना सुरक्षिततेच्या कमतरतेमुळे काही युजर्सच्या फोनमध्ये एक Spyware सॉफ्टवेयर डाऊनलोड होत आहे. त्यामुळे तुमची खाजगी माहिती चोरी होऊ शकते. हे स्पायवेअर कॉलिंग फंक्शनच्या माध्यमातून येऊ शकतं.

फायनाशियल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, स्पायवेअर इजराईल सायबर इंटेलीजेंस कंपनी एनएसओ द्वारे तयार करण्यात आले आहे. व्हॉट्सअॅप मधील सुरक्षिततेच्या कमतरतेमुळे ते डाऊनलोड होत आहे.

जगभराता दीडशे कोटीहून अधिक व्हॉट्सअॅप युजर्स आहेत. मात्र आतापर्यंत स्पायवेयरमुळे किती युजर्सला फटका बसला आहे, हे समजू शकलेले नाही. त्यामुळे या स्पायवेयरपासून आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन अपग्रेट करा आणि फोनच्या डाऊनलोड फोल्डरमध्ये तुम्ही डाऊनलोड केलेल्या गोष्टी ताबडतोब डिलिट करा.