Published On : Sat, Feb 24th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात काँग्रेसने कसली कंबर; लोकसभेसाठी नियुक्त केले विधानसभानिहाय निरीक्षक !

Advertisement

नागपूर :लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी प्रचार, प्रसाराचे नियोजन करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, तयारीचा आढावा घेणे यासाठी काँग्रेसने विधानसभानिहाय निरीक्षक नियुक्त केले आहेत.

राज्यातील २५२ विधानसभा मतदारसंघांसाठी निरीक्षकांची यादी शुक्रवारी प्रदेश काँग्रेसने जाहीर केली. काँग्रेसच्या उद्योग व व्यापारी आघाडी सेलचे प्रदेश अध्यक्ष अतुल कोटेचा यांच्याकडे मध्य नागपूर तर महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष तक्षशिला वाघधरे यांच्याकडे हिंगणा मतदारसंघाते निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच गज्जू यादव (काटोल), सचिन किरपान (सावनेर), अनिल आदमने (उमरेड), बाबा आष्टनकर (कामठी), नाना कंभाले (रामटेक), प्रा. दिनेश बानाबाकोडे (दक्षिण-पश्चिम नागपूर), राहुल घरडे (दक्षिण नागपूर), डॉ. राजू देवघरे (पूर्व नागपूर), प्रशांत धवड (पश्चिम नागपूर), ओवेस कादरी यांच्यावर उत्तर नागपूरची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) नाना गावंडे यांनी दिली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.