Published On : Sat, Mar 9th, 2024

नागपुरातील ‘फूड कोर्ट’ बंद होण्यामागचे कारण काय? होरायझन इंडिया ग्रुपचे हर्षल रामटेके म्हणाले…

Advertisement

नागपूर : काही दिवसांपूर्वी शहरात फूड कोर्टचा ट्रेंड सुरु झाला होता. नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक स्टॉलमधून आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेता येत होता. मात्र कालांतराने फूड कोर्टची क्रेज कमी होत असून ते बंद होत चालले आहे. मात्र यामागचे कारण काय ? यासाठी ‘नागपूर टुडे’ने होरायझन इंडिया ग्रुपचे हर्षल रामटेके यांच्याशी संवाद साधला.

रेस्टारेंट क्षेत्रात व्यवसाय करणे हे काही सोपे काम नाही.जमीन मालक आणि रेस्टारेंट मालकांमध्ये सामंजस्य नाही.सर्वांना यातून पैसा हवा.मात्र त्यामुळे काही गोष्टींकडे दुर्लक्ष होते.

नागपुरात आजच्या परिस्थितीत ठिकठिकणी हॉटेल आणि रेस्टारेंट खुले झाले आहे.

त्यामुळे जनतेचा कल नवीन ठिकाणी जाण्याकडे असतो. दुसरीकडे ‘फूड कोर्ट’ मध्ये कमी मनुष्यबळाचा आभावामुळे ग्राहकांचा हिरमोड होत असतो. तसेच अनेक ‘फूड कोर्ट’ प्रसिद्धीकरीता सोशल मीडियावर सक्रिय नसतात.याच कारणांमुळे शहरातील ‘फूड कोर्ट’ बंद होत चालले आहे.